महाराष्ट्र सरकारकडून पूरग्रस्त भागात तात्पुरत्या निवाऱ्याची सोय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Aug-2019
Total Views |


महाराष्ट्रात सध्या पूरग्रस्त परिस्थितीतून सावरण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. यावर वेगवेगळ्या पातळीवर उपाययोजना करण्याचे काम देखील मोठ्या प्रमाणात सुरु आहे. महाराष्ट्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार नागरिकांना तात्पुरता निवारा म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात १८७ तर सांगली जिल्ह्यात ११७ तात्पुरते निवारा केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. तर तेथील लोकांना स्वच्छ पाणी,जेवणाची व्यवस्था, औषधोपचार उपलब्ध. कोल्हापूर,सांगली जिल्ह्यातील ४३हजार ९२२ जनावरांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यश आले आहे.

काही वेळेपूर्वीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरापरीस्थितीचा आढावा घेण्यासाठी कोल्हापूरमध्ये भेट दिली. तसेच तेथील पुरग्रस्तांकडून परिस्थितीविषयी माहिती देखील घेतली. सध्या कोल्हापूरमध्ये हेलिकॉप्टरच्या मदतीने अन्न आणि काही मूलभूत गोष्टी पोहोचवण्याचे काम सुरूच आहे.
  

दरम्यान मुंबईहून देखील ४५ जणांची २ पथके रवाना झाली आहेत. कोल्हापूर आणि सातारा विभागातील पूरग्रस्त भागात वैद्यकीय मदतीसाठी ही पथके काम करणार आहेत. ही पथके आवश्यक औषधे आणि इतर साहित्याने सुसज्ज आहेत.

@@AUTHORINFO_V1@@