चिंतामणी मंडळाचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

    10-Aug-2019
Total Views |


 


मुंबई : रविवार दि.११ ऑगस्टरोजी शतक महोत्सवी चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा गणेश टॉकीज येथून दुपारी २ वाजता संपन्न होणार आहे. यावेळी मुंबईतील कोल्हापूर, सातारा निवासी चिंचपोकळीच्या चिंतामणीला 'पूरस्थिती लवकरात लवकर निवळू दे' म्हणून साकडे घालणार आहेत.

 

महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे कोकण व पश्चिम महाराष्ट्रावर जे अस्मानी संकट ओढवले आहे त्यामुळे तातडीची मदत म्हणून चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने ५,००,०००/- रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात येणार आहे, असे मंडळाचे अध्यक्ष उमेश सीताराम नाईक यांनी शुक्रवारी जाहीर केले आहे.

 

या आगमन सोहळ्यात मंडळाच्या वतीने पूरग्रस्तांसाठी दानपेट्या ठेवण्यात येणार असून हा सर्व निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्यात येणार आहे. त्यामुळे या सोहळ्यात सामील होणाऱ्या तरुणाईने आपली सामाजिक बांधिलकी राखून दानपेटीत सढळहस्ते मदत करण्याचे आणि वास्तवतेचे भान राखून आगमन सोहळ्यात सामील होण्याचे आवाहन मंडळाचे मानद सचिव वासुदेव सावंत यांनी केले आहे.