पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कलाकारांनीही कंबर कसली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Aug-2019
Total Views |


 

महाराष्ट्राला पावसाने झोडपल्यामुळे सध्या महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थितीने हाहाकार मजला आहे. या पुराचा प्रचंड फटका तिथल्या रहिवाशांना होत आहे. आत्तापर्यंत अनेकांचे जीव गेले असून अनेक जण जीव मुठीत घेऊन राहत आहेत. अशावेळी प्रशासनाने मोठ्या प्रमाणात मदत कार्याची मोहीम सुरु केली आहेच मात्र हे काम एवढे सोपे नसल्याचे जास्तीत जास्त लोकांच्या मदतीची गरज आहे आणि ही काळाची गरज लक्षात घेऊन लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे, क्षिती जोग, हेमंत ढोमे, श्रुती मराठे, जितेंद्र जोशी, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर अशा अनेक सृजनशील कलाकारांनी त्यांच्या चाहत्यांना तसेच महाराष्ट्रातील जनतेला मदत कार्यात जास्तीत जास्त सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

 

गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, कराड, इचलकरंजी या आणि अशा कित्येक भागात पावसाच्या पाण्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आणि एक मोठे संकट ओढवले. यावर मात करणे हे एकट्या दुकट्याचे काम नाही आणि यासाठी आता आपली कलाकार मंडळी देखील या कामात मागे नसून या सत्कृत्याला हातभार लावत आहेत.

 

 

मुंबई, पुणे, ठाणे येथे पूरग्रस्त परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना द्यायचे सामान जमा करण्यासाठी काही संपर्क क्रमांक आणि संकेतस्थळे निश्चित करण्यात आली असून या विषयीची माहिती संबंधित कलाकारांनी आपल्या सोशल मीडियावर टाकली आहे. तरी प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार या ठिकाणी जाऊन मोठ्या संख्येने मदत करावी असे आवाहन या कलाकारांकडून केले जात आहे.

@@AUTHORINFO_V1@@