मोदीजी संयमी आणि पर्यावरणप्रेमी : बेअर ग्रिल्स

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Aug-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचावर 'मॅन व्हर्सेस वाईल्ड' या जगप्रसिद्ध मालिकेमध्ये विशेष कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहे. त्याचा होस्ट बेअर ग्रिल्स याने त्याआधी पंतप्रधानाचे कौतुक करताना सांगितले की, "घनदाट जंगलात, अत्यंत खडतर परिस्थितीतही मोदींचा वावर अगदी सहज होता, त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य जराही कमी झाले नाही. तसेच, त्यांना पर्यावरणाबद्दलही प्रचंड काळजी आहे." एका मुलाखतीमध्ये बेअर ग्रिल्सने पंतप्रधान नरेंद्र मोदी, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क, भारत याबाबत भरभरुन बोलला आहे.

 

"सतत सुरू असलेल्या पावसातही मोदींच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य कायम होते. ते खूप शांत आणि संयमी आहेत. संततधार पावसात जेव्हा सीक्रेट सर्व्हिसने त्यांच्यासाठी छत्री काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते बोलले की 'मी ठीक आहे' आणि माझ्यासोबत नदीच्या दिशेने चालू लागले. आम्हाला नदी पार करायची होती, मी माझ्या हातांनी तराफा तयार केला. सीक्रेट सर्व्हिसने सांगितले की पंतप्रधानांना असे घेऊन जाता येणार नाही, यात धोका आहे. त्यानंतरही मोदींनी त्यांना समजावले. आम्ही त्या तराफ्यावर होतो तेव्ही ती बुडू लागली. मी खाली उतरलो आणि तराफा खेचू लागलो. तेव्हाही मोदी खूपच शांत दिसले. त्यांचा या स्वभावाने मला बरेच काही शिकता आले." असा अनुभव त्याने सांगितला.

 

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पर्यावरणावर प्रचंड प्रेम आहे. त्यांना निसर्ग अगदी मनापासून आवडतो याचा अनुभव त्यांच्यासोबत केलेल्या कार्यक्रमात मला घेता आला. त्यांना पर्यावरणाबाबत असलेली ओढ आणि वाटणारं प्रेम याचमुळे मी त्यांच्यासोबत हा कार्यक्रम केला. त्यामुळे आम्ही जेव्हा सोबत होतो तेव्हा आम्हाला फारशा अडचणी आल्या नाहीत. जेव्हा आम्ही मॅन व्हर्सेस वाईल्ड कार्यक्रमाच्या शूटिंगला सुरुवात केली तेव्हाच मला वाटले होते की घनदाट जंगलात येऊनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वातावरणाशी जुळवून कसे काय घेतले? त्यानंतर मला समजले की त्यांनी त्यांच्या आयुष्यातली अनेक वर्षे जंगलात घालवली आहेत." असेही त्याने पुढे सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@