मराठवाड्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Aug-2019
Total Views |


 


महाराष्ट्रात एकीकडे सांगली आणि कोल्हापूरमध्ये पूरपरिस्थिती ओढवली आहे तर दुसरीकडे मराठवाड्यात अजूनही पावसाचे चिन्ह दिसत नाही. मराठवाड्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला कालपासून सुरूवात झाली. औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयातल्या डॉपलर रडारच्या ठिकाणी असलेल्या नियंत्रण कक्षाकडून वैमानिक आणि शास्त्रज्ञांना ढगांचे छायाचित्र पाठवण्यात आले. त्यानंतर दुपारच्या सुमारास हे विमान आकाशात झेपावल्याची माहिती या मोहिमेचे संचालक कान्हुराज बगाटे यांनी दिली. मराठवाडा आणि विदर्भासह उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या काही भागात हा प्रयोग केला जाणार असल्याचे, बगाटे यांनी सांगितले.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागातून आतापर्यंत अडीच लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दल, सैन्यदल, नौदल, तटरक्षक दल यांचे बचाव सध्या कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातही पूरस्थिती गंभीर होत असून, शहादा, अक्कलकुवा आदी गावातल्या दोनशेहून अधिक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अनेक नद्या, नाल्यांवरुन पाणी वाहत असल्यानं जिल्ह्यातली राज्य परीवहन महामंडळाची बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे.


@@AUTHORINFO_V1@@