'ट्रिपल सीट'चे पोस्टर रिलीज, दिवाळीत उलगडणार वायरलेस प्रेमाची गोष्ट !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Aug-2019
Total Views |


 


अहमदनगर : टेलिव्हिजन माध्यमातील मालिकांचे दिग्दर्शन करून घराघरात पोचलेला युवा दिग्दर्शक संकेत पावसेने आता रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्याचा निर्णय घेत चित्रपट क्षेत्रात भरारी घेतली आहे. 'ट्रिपल सीट - गोष्ट वायरलेस प्रेमाची' असे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव असून २४ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. फेसबुकवर या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत संकेतने त्याच्या 'ट्रिपल सीट' विषयी माहिती दिली. अँड. अभिजित दळवी यांनी या चित्रपटाचे लेखन केले असून अक्षय देशपांडे हा मुख्य सहाय्यक दिग्दर्शक म्हणून या चित्रपटाचे काम पाहणार आहे.

 

'अनुष्का मोशन पिक्चर अँड इंटरटेन्टमेंट्स व अहमदनगर फिल्म कंपनी'ने या चित्रपटाची निर्मिती केली असून नरेंद्र फिरोदिया हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. त्याचबरोबरीने स्वप्नील मुनोत व पुष्कर तांबोळी हे सहनिर्माता व साहाय्यक निर्मात्याची जबाबदारी सांभाळत आहेत. दरम्यान, या चित्रपटाच्या स्टारकास्टची नावे संकेतने अजून गुलदस्त्यात ठेवली असल्याने या चित्रपटामध्ये कोणाच्या भूमिका असणार ? याविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

@@AUTHORINFO_V1@@