अण्णा भाऊंचे साहित्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक - डॉ. अरुणा ढेरे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Aug-2019
Total Views |



पुणे : लोकमान्य टिळक आणि अण्णा भाऊ साठे या महाराष्ट्र घडवणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्ती आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांच्या साहित्यातून प्रेरणा घ्यावी, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी केले. त्या लोकमान्य टिळक स्मृतिशताब्दी आणि अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षारंभानिमित्ताने श्री विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळातर्फे आयोजित ग्रंथदिंडी कार्यक्रमात बोलत होत्या.

 

महापौर मुक्ता टिळक, अण्णा भाऊंच्या स्नुषा सावित्रीबाई साठे, लोकमान्य टिळक यांचे पणतू दीपक टिळक, अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, स्थायी समितीचे अध्यक्ष, स्वागताध्यक्ष सुनील कांबळे, महोत्सवाचे निमंत्रक राजेश पांडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख डॉ. सुनील भंडगे, संवाद पुणेचे सुनील महाजन, चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे यांच्या उपस्थितीत पालखीचे, ग्रंथांचे पूजन करण्यात आले.

 

सारसबाग येथील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. अण्णा भाऊ साठे यांच्या ग्रंथसंपदेसह लोकमान्य टिळक यांचा गीतारहस्य हा ग्रंथही पालखीत ठेवला होता. सारसबाग येथील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. ग्रंथदिंडी बाजीराव रस्ता, अप्पा बळवंत चौक, नारायण पेठमार्गे येऊन केसरीवाड्यात दिंडीचा समारोप झाला.

@@AUTHORINFO_V1@@