
And the filming begins today...
नावावरून हिंदी वाटले तरी चित्रपट मात्र मराठी आहे. सिद्धार्थ जाधव, अनिकेत विश्वासराव आणि दीप्ती देवी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'जागो मोहन प्यारे' या चित्रपटाच्या शूटिंगला नुकतीच सुरुवात झाली आहे. 'जागो मोहन प्यारे' या नाटकाविषयी आपण ऐकेल असेलच आता याच प्रसिद्ध नाटकाचे रूपांतरण चित्रपटाच्या स्वरूपात करण्यात येत आहे. 'जागो मोहन प्यारे' या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केलेल्या प्रियदर्शन जाधवनेच चित्रपटाचेही लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.
Excited to share this 1st ever teaser poster of "Jaago Mohan Pyare" with you all!
All my heartfelt best wishes to the entire cast & crew of "Jaago Mohan Pyare"!!!
"गणपती बाप्पा मोरया" 🙏🏼😊 pic.twitter.com/5c7nxQ5Nou
स्वरुप रिक्रिएशन अँड मीडिया, लोकीज स्टुडिओ आणि अमेय विनोद खोपकर प्रस्तुत या चित्रपटाचे स्वाती अमेय खोपकर, आकाश पेंढारकर, सचिन नारकर, विकास पवार, सचिन मारुती लोखंडे, अतुल जनार्दन तारकर, विक्रम बरवाल निर्माते आहेत. तर निनाद नंदकुमार बत्तीन आणि तबरेज पटेल सहनिर्माते आहेत. आगामी वर्षात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यापूर्वी नाटकामध्ये मोहनची भूमिका सिद्धार्थने अगदी दमदार पद्धतीने साकारली आता या चित्रपटात तो आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भारावून टाकतो का हे पाहणे महत्वाचे असेल.