पैसे वाचवण्यासाठी इम्रान खान यांच्यावर अशी वेळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jul-2019
Total Views |


इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अमेरिका दौऱ्याचा खर्च उचलणेही त्यांच्या देशाला न परवडण्यासारखा झाला आहे. त्यामुळे पैसे वाचवण्यासाठी त्यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीसाठी जाताना ते हॉटेलमध्ये राहण्याऐवजी अमेरिकेतील पाकिस्तानी राजदूतांच्या शासकीय निवासस्थानी राहणार आहेत. अमेरिका दौऱ्याचा आर्थिक भार उचलणेही पाकिस्तानला कठीण जात आहे.

 

पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, इम्रान खान अमेरिकेतील पाकिस्तानचे राजदूत अजद मजीद यांच्या निवासस्थानी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पैसे वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत आहे. अमेरिकेतील प्रशासनाने याला अद्याप मंजूरी दिली नसली तरीही पाकिस्तानने या प्रक्रियेची संपूर्ण तयारी केली आहे.

 

पैसे वाचवण्याच्या नादात सुरक्षेशी खेळ ?

इम्रान खान यांनी जरी ही शक्कल लढवली असली तरीही पाकिस्तानच्या या प्रस्तावाला अमेरिकेची सीक्रेट सर्व्हीस एजेंन्सी याला मान्यता देईल, अशी शक्यता धूसर आहे. पाकिस्तानचे अमेरिकेतील दूतावास कार्यालय हे वॉशिंग्टन शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. त्याला लागून इतर देशांचीही दूतावास कार्यालये आहेत. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होतो.

 

इम्रान खान यांच्या दौऱ्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीसह अनेक मान्यवर या जागी येण्याची शक्यता आहे. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही जागा लहान आहे. त्यामुळे अमेरिकेतील सुरक्षा यंत्रणा या मागणीला परवानगी देतील, अशी शक्यता धूसर आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@