
केवळ भाजपला विरोध करण्यासाठी एकत्र आलेले कुमारस्वामी यांचे सरकार सत्ता टिकविण्यासाठी तारेवरची कसरत करीत आहेच. कर्नाटक सरकारला आधार देणारे बुरुज ढासळू लागले आहेत. ते डागडुजी करून सावरले जातात की पूर्णपणे ढासळतात, ते लवकरच दिसून येणार आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेस पक्षाचे जे काही थोडेफार बुरुज अस्तित्वात आहेत, ते ढासळू लागले आहेत. राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर तर आता पक्षाचे नेतृत्व कोण करणार, असे भलेमोठे प्रश्नचिन्ह त्या पक्षापुढे उभे राहिले आहे. त्यातून मार्ग काढण्याचे त्या पक्षाचे प्रयत्न चालू असले तरी, गांधी-नेहरू घराण्याच्या नेतृत्वाशिवाय काँग्रेस, ही कल्पनाच त्या पक्षातील अनेकांच्या पचनी पडत नसल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच राहुल गांधी यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न चालू आहेत. राहुल गांधी यांच्यापाठोपाठ पक्षातील तरुण नेत्यांनीही राजीनामा देण्याचे सत्र चालू केले आहे. आपल्या राजीनाम्यामुळे राहुल गांधी यांचे मनपरिवर्तन होईल, असे या नेत्यांना वाटत असावे! या घडामोडी सुरू असतानाच कर्नाटकातील जनता दल (धर्मनिरपेक्ष) आणि काँग्रेस आघाडीचे सरकार राहते की पडते, अशी स्थिती निर्माण झाली आहे. नेहमीप्रमाणे काँग्रेसने यामागे भारतीय जनता पक्ष असल्याचा आरोप केला आहे.
कर्नाटकमध्ये जनता दल आणि काँग्रेसच्या १४ सदस्यांनी तसेच दोन्ही पक्षाच्या सर्व मंत्र्यांनीही राजीनामे दिल्याने त्या सरकारपुढे बिकट प्रश्न उभा राहिला आहे. मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडू राव हे परदेशात गेले असतानाच हा बंडाचा झेंडा फडकविण्यात आला. मुख्यमंत्री कुमारस्वामी रविवारी बंगळुरूला परतले असून आता या बंडखोरांची मने वळविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. काँग्रेस पक्षातील अंतर्गत धुसफूस या बंडाळीला कारणीभूत असल्याने या बंडखोर आमदारांना मंत्रिपदाची आमिषे दाखविली जात आहेत. पण, त्या आमिषांना हे बंडखोर भुलल्याचे अजून दिसत नाही. बंडखोर आमदार भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे प्रताप गौडा-पाटील या नेत्याने स्पष्ट केले आहे. काहींनी आपल्याला डावलले जात असल्यावरून बंड केले आहे, तर जनता दल (धर्मनिरपेक्ष) आमदार के. सी. नारायण गौडा यांनी, माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या परिवारातील महिला सदस्यांकडून आपणास जी वाईट वागणूक देण्यात आली, त्यामुळे आपण राजीनाम्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.
कर्नाटकमधील ही बंडाळी थांबविण्यासाठी काँग्रेसचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे, कर्नाटकचे प्रभारी के. सी. वेणुगोपाल, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, जी. परमेश्वर आदी नेते कामाला लागले असून या बंडखोरांची मने वळविण्यात यश येईल, असे त्यांना वाटत आहे. जे बंडखोर आमदार विमानाने मुंबईस गेले, ते त्यांच्या स्वत:च्या इच्छेने गेले नसल्याचे मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे. "बंडखोर आमदार आमच्या पक्षाच्या आमदारांच्या संपर्कात असून ते परत येतील," असेही त्यांनी म्हटले आहे. या बंडखोर आमदारांमध्ये जे काँग्रेसचे आमदार आहेत, त्यातील काहींचा उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांच्यावर राग आहे. काँग्रेसचे 'संकटमोचक' नेते आणि जलसंपदामंत्री डी. के. शिवकुमार यांनी, "जर सरकार वाचणार असेल तर आपण सर्वप्रथम राजीनामा देऊ," असे म्हटले आहे. या बंडखोर आमदारांसाठी विद्यमान मंत्रिमंडळातील काहींनी राजीनामा देण्याचीही तयारी दर्शविली आहे.
कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष के. आर. रमेश यांनी या बंडखोर आमदारांचे राजीनामे स्वीकारल्यास काँग्रेस-जनता दल (धर्मनिरपेक्ष) आघाडीचे संख्याबळ ११८ वरून एकदम १०५ वर येऊ शकते. २२४ सदस्यीय कर्नाटक विधानसभेत बहुमतासाठी ११३ सदस्य असणे आवश्यक आहे. दुसरीकडे, कर्नाटक विधानसभेत भारतीय जनता पक्षाची सदस्यसंख्या १०५ आहे. ज्या आमदारांनी राजीनामे दिले आहेत, त्यांच्या राजीनाम्यावर आपण मंगळवारी निर्णय घेऊ, असे विधानसभा अध्यक्षांनी सांगितले आहे. काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी, भारतीय जनता पक्ष बंडखोरीस चिथावणी देत असल्याचा आरोप केला आहे. आपल्या आमदारांना नीट सांभाळता येत नाही आणि त्याचे खापर भाजपवर फोडायचे, हा काँग्रेसचा अजब न्याय म्हणायला हवा!
दरम्यान, कर्नाटकमधील भाजप नेते सदानंद गौडा म्हणाले की, "विद्यमान सरकारमध्ये राहणे हे राज्याच्या आणि मतदार संघाच्या हिताचे वाटत नसल्यावरून त्या आमदारांनी आपले राजीनामे दिले आहेत. राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून सरकार बनविण्यासाठी आम्हास पाचारण केल्यास आमची त्यास तयारी आहे. आमच्याकडे १०५ संख्याबळ आहे," असेही त्यांनी म्हटले आहे. एकूण पुढे काय काय घटना घडतात, याकडे भाजपचे बारकाईने लक्ष आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी "आपला पक्ष 'योग्यवेळी योग्य निर्णय' घेईल," असे म्हटले आहे. मात्र, कर्नाटकमधील काँग्रेस नेत्यांना सरकार पडणार नाही, असे खात्रीने वाटत आहे.
राजीनामे दिले आहेत, पण ते अजून स्वीकारले गेले आहेत का?, असे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणतात, तर माजी पंतप्रधान आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) नेते एच. डी. देवेगौडा यांनी, "आता पुढील निर्णय विधानसभा अध्यक्षांवर अवलंबून आहे," असे म्हटले आहे. कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन १२ जुलै रोजी सुरू होत आहे. त्या आधीच कुमारस्वामी सरकार कोसळते की सभागृहात त्या सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर ते कोसळते, हे पाहण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कर्नाटकातील सत्तापेच कायम#HDKumarswami #Karnatka https://t.co/jSCghGrA6I
— महा MTB (@TheMahaMTB) July 7, 2019
केवळ भाजपला विरोध करण्यासाठी एकत्र आलेले कुमारस्वामी यांचे सरकार सत्ता टिकविण्यासाठी तारेवरची कसरत करीत आहेच. मध्यंतरी, हे सरकार चालविणे कठीण असल्याचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी अगदी डोळ्यांमध्ये पाणी आणून म्हटले होते, तर देवेगौडा यांनीही लवकरच मध्यावधी निवडणुकांना सामोरे जावे लागेल, असे सूचित केले होते. कर्नाटक सरकारला आधार देणारे बुरुज ढासळू लागले आहेत. ते डागडुजी करून सावरले जातात की पूर्णपणे ढासळतात, ते लवकरच दिसून येणार आहे.
मिलिंद देवरा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर मुंबई प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी त्यांच्यावर टीका केली... तर निरुपम यांच्यावर भाई जगताप यांनी निशाणा साधला#Congress #MumbaiCongress @BhaiJagtap1 @milinddeora @sanjaynirupam https://t.co/mCJxOUM1HW
— महा MTB (@TheMahaMTB) July 8, 2019
काँग्रेसमध्ये राजीनामासत्र
कर्नाटक राज्यात राजकीय घडामोडी वेगाने घडत असतानाच इकडे काँग्रेस पक्षातही राजीनामासत्र सुरू आहे. राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपद सोडल्यानंतर आता त्यांचे निकटचे सहकारी ज्योतिरादित्य शिंदे, मिलिंद देवरा आणि काँग्रेसच्या अन्य काही नेत्यांनी आपापल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी केवळ तरुण रक्तच काँग्रेसला पुन्हा उभारी देऊ शकते, असे भाष्य केले आहे. देशातील ६५ टक्के जनता ही ३५ वर्षे वयोगटाखालील आहे. हे लक्षात घेऊन जो नेतृत्वबदल होईल, त्यामध्ये याचे प्रतिबिंब दिसायला हवे, असे त्यांनी म्हटले आहे. पण, राहुल गांधी यांच्यानंतर पक्षाची धुरा कोणाकडे सोपवायची, असा गहन प्रश्न काँग्रेसपुढे पडला आहे.
राजीनामा देण्याची परंपरा तर राहुल गांधींनी सुरू केली आहे. मग जर अशावेळी काँग्रेसमधील कोणी राजीनामा देत असेल तर त्यासाठी भाजपाला जबाबदार ठरवणे चुकीचे आहे, अशा शब्दांत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज लोकसभेत राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.#KarnatakaCrisis pic.twitter.com/pDKtQjHkOz
— महा MTB (@TheMahaMTB) July 8, 2019
मल्लिकार्जुन खर्गे, सुशीलकुमार शिंदे यांच्यापासून शशी थरूर यांच्यापर्यंत अनेकांची नावे घेतली जात आहेत. पण, काँग्रेसकडे असे नव्या पिढीला प्रेरणा देऊ शकेल असे तरुण नेतृत्व आहे का? त्या नेतृत्वास देशव्यापी प्रभाव पाडता येईल का, अशा प्रश्नांची उत्तरे सध्या अनुत्तरित आहेत. पक्षाध्यक्षपद सोडलेले राहुल गांधी हे सध्या, त्यांच्यावर अब्रुनुकसानीचे जे खटले दाखल करण्यात आले आहेत, त्यावर जामीन मिळविण्यासाठी एका न्यायालयातून दुसर्या न्यायालयात खेटे घालताना दिसत आहेत. त्यामुळे आपल्या म्हणण्यानुसार मान डोलविणारा पक्षाध्यक्ष शोधण्यासाठी त्यांना वेळ तरी मिळायला हवा ना!
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी साधला राहुल गांधी यांच्यावर निशाणा#ParliamentSession #Congress #RahulGandhihttps://t.co/0SDxz999pm
— महा MTB (@TheMahaMTB) July 8, 2019
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat