कर्नाटकातील सत्तापेच कायम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jul-2019
Total Views |


 

बंगळरू : कर्नाटकमध्ये अवघ्या तेरा महीन्यांच्या कॉंग्रेस आघाडी सरकारला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील, अशी शक्यता आहे. काँग्रेस-जेडीएसच्या बारा आमदारांच्या राजीनाम्यानतर आलेल्या राजकिय अस्थिरतेला थांबवण्यासाठी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांना आघाडी सरकारमध्ये नवे मुख्यमंत्री बनवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, मी मुख्यमंत्रीपदी बसणार ही अफवा असल्याचे खरगे यांनी सांगितले.

 

दुसरीकडे, भाजपने काँग्रेस-जेडीएस आमदारांच्या राजीनामा हा काँग्रेसचा स्टंट असल्याचे सांगितले आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, "काँग्रेस लालची सिद्धारमैया यांना मुख्यमंत्री करण्यासाठी हा ड्रामा रचत आहे. काँग्रेस-जेडीएस आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर देवगौडा यांनी शनिवारी रात्री सोनिया गांधीसह भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी खरगेंना समर्थन देण्यावर चर्चा केली. सोनिया गांधींनी रात्री पक्षाच्या कोअर कमेटीची बैठक बोलवली आणि यात गौडांच्या पर्यायावर विचार करण्यात आल्याचे समजते. बैठकीत खरगेंना कर्नाटकला पाठवण्याचा निर्णय घेतला गेला.


केंद्रीय मंत्री जोशी म्हणाले, कॉंग्रेस-जेडीएस ही अपवित्र आघाडी आहे. काँग्रेस कुमारस्वामीला मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी हे करत आहे तर आमदारांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हात असल्याच्या आरोपावरही त्यांनी पलटवार केला. काँग्रेसकडे नेता नसल्याचे असे बिनबुडाचे आरोप केले जात आहेत.

 

काँग्रेस-जेडीएसच्या बारा आमदारांचा राजीनामा

कर्नाटकातील १३ महिन्यांपूर्वीचे काँग्रेस-जनता दल सेक्युलर (जेडीएस) आघाडी सरकार अडचणीत आले आहे. दोन्ही पक्षांच्या बारा आमदारांनी शनिवारी विधानसभा सभापतींच्या कार्यालयात जाऊन राजीनामे दिले. राजीनाम्यानंतर आमदारांनी राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेऊन राजीनामे दिल्याचे सांगितले.

 


सदानंद गौडा यांनी राज्यपालांनी भाजपला पाचारण केले तर सरकार स्थापन करण्याची पक्षाची तयारी असल्याचे म्हटले आहे. असे घडलेच तर येदियुरप्पा मुख्यमंत्री असतील. आमदारांच्या राजीनाम्याशी भाजपचा काही संबंध नाही. आम्ही सध्या सदस्य नोंदणी अभियानात व्यग्र असून घटनाक्रमावर नजर ठेवून आहोत. वेळ येईल तेव्हा निर्णय घेऊ.
- बी. एस. येदियुरप्पा, विरोधी पक्षनेते, भाजपचे प्रदेशाध्यक्ष

 

विधानसभेतील पक्षातील आमदार

एकूण  : २२५

बहुमत : ११३


काँग्रेस : ७९ (सभापतींसह)


जेडीएस ३७

भाजप  : १०५

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@