वर्ल्डकपच्या सामन्यादरम्यान 'जस्टिस फॉर काश्मीर' बॅनर लावलेल्या विमानाच्या मैदानावर घिरट्या, टीम इंडियाची सुरक्षा ऐरणीवर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jul-2019
Total Views |

 

 
लीड्स : शनिवारी भारत विरुद्ध श्रीलंकेमध्ये विश्वचषकाचा ४४ वा सामना सुरू असताना एक विमान मैदानावर घिरट्या घालताना दिसून आले. या विमानाला 'जस्टिस फॉर काश्मीर' नावाचे बॅनर लावलेले होते. या विमानाने मैदानाला 4 घिरट्या घातल्या. यामुळे भारतीय टीमच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. विमानाचा हा व्हिडिओ पाहता-पाहता व्हायरल झाला.
 

तत्पूर्वी, पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यादरम्यानही असाच प्रकार आढळून आला. पाक विरुद्ध अफगाणिस्तानचा सामना सुरू असताना जस्टिस फॉर बलुचिस्तान या नावाचा बॅनर असलेल्या विमानाने मैदानाला घिरट्या घातल्या होत्या.

 
दरम्यान, आजच्या प्रकारानंतर आयसीसीने तात्काळ दखल घेतली आहे. विश्वचषकादरम्यान प्रसारित होणाऱ्या राजकीय संदेशांकडे ते दुर्लक्ष करणार नाहीत. याप्रकरणी आम्ही स्थानिक पोलिसांच्या मदतीने अशा घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी प्रयत्न करत आहोत.
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat 
@@AUTHORINFO_V1@@