कर्नाटकात राजकीय भूकंप; काँग्रेस आणि जेडीएसच्या ११ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे सोपवले राजीनामे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jul-2019
Total Views |

 

 
बंगळुरू : कर्नाटकातील काँग्रेस–जेडीएस सरकारमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. कारण, काँग्रेस– जेडीएस सरकारमधील ११ आमदार आपले राजीनामे विधानसभा अध्यक्षांकडे सोपवले आहेत. त्यामुळे सरकार स्थापन केल्यापासून अस्थिरतेच्या छायेत असलेले काँग्रेस– जेडीएसचे सरकार १३ महिन्यामध्येच अडचणीत आले आहे.
 

काँग्रेसमधील अनेक आमदार मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्यावर नाराज असल्यामुळेच ११ आमदारांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. मागच्या वर्षी कर्नाटक विधानसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपाने १०४ जागा मिळवल्या. मात्र पूर्ण बहुमत नसल्याने सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजपाला सत्ता काबीज करता आली नाही. त्यानंतर भाजपाला दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएस एकत्र आले. जेडीएसचे कुमारस्वामी हे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. मात्र आता सत्तेतल्या दोन पक्षांमधल्याच ११ आमदारांनी राजीनामा दिल्याने दोन्ही पक्षांच्या अडचणी वाढल्या आहेत. कर्नाटकात पुन्हा एकदा राजकीय हालचालींनी वेग घेतला असून भाजपची भूमिका आता महत्त्वाची ठरणार आहे.

 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat 
@@AUTHORINFO_V1@@