फेसबुक, इन्स्टा आणि व्हाट्स अॅप सेवा पूर्ववत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jul-2019
Total Views |



नवी दिल्ली : बुधवारी दुपारपासून भारतासह जगभरात अनेक ठिकाणी फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हाट्स अॅप सेवा डाऊन होत्या. या तिन्ही अॅपचा वापर सोशल मीडियावर जास्त होतो. परंतु, गुरुवारी सकाळपासून ह्या सेवा पूर्ववत करण्यात आल्याचे ट्विट कंपनीने केली आहे. यामुळे वापरकर्त्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. सेवा डाऊन झाल्यामुळे जो त्रास युजर्सना झाला त्याबद्दल कंपनीने दिलगिरीदेखील व्यक्त कंपनीकडून करण्यात आली.

 
 
 

सोशल मीडियावर सर्वात जास्त वापर असणारे फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाट्स अॅप बुधवार दुपारपासूनच जगभरात डाऊन झाले होते. विशेषत: युरोप व अमेरिकेत हे जास्त प्रमाणत जाणवत होते. त्यानंतर इंग्लंड, भारत आणि इतर अनेक ठिकाणी याचा परिणाम झाला. व्हाट्स अॅपवरचे व्हिडीओ आणि फोटो अपलोड होत नसल्याचे अनेकांनी ट्विटरवरून सांगितले होते. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाट्स अॅप ही तिन्ही एकाच वेळी बंद झाल्याने युजर्सची अडचण झाली होती. मात्र, आता ही सेवा पुर्व पदावर आली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@