
CM @Dev_Fadnavis approved NMRDA budget of ₹1529.84 crore.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 4, 2019
Major provisions include:
✅₹422crore for #PMAY
✅₹221crore Koradi development
✅₹109crore for DeekshaBhumi development
✅₹132crore for Tajbag development
✅₹41 crore for Dr Babasaheb Ambedkar memorial at Chicholi pic.twitter.com/QabgLxblDi
एनएमआरडीए क्षेत्रातील विविध प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून ४३२५ घरकुलांची निर्मिती(४२२ कोटी), कोराडी तीर्थक्षेत्र विकास आराखडा (२२१ कोटी), ताजबाग दर्गा विकास आराखडा(१३२ कोटी), पोलीस गृहनिर्माण प्रकल्प (१४५ कोटी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेशन सेंटर (११४ कोटी), दीक्षा भूमी विकास (१०९ कोटी), फुटाळा तलाव संगीत कारंजे (१०० कोटी) आदी १३०० कोटी रुपयांचे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. यासह अन्य विकास कामांसाठी अनुमानित १५२९ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास या बैठकीत मंजूरी देण्यात आली.
CM @Dev_Fadnavis chaired 5th meeting of Nagpur Metropolitan Region Development Authority (NMRDA) in Mumbai.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 4, 2019
Ministers Chandrashekhar Bawankule, Yogesh Sagar, Mahadev Jankar were present. pic.twitter.com/U4cAa21Om7
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांची विक्री ऑनलाईन सोडतीद्वारे करण्यासाठी घरकुल वाटपाकरिता आरक्षण धोरणास यावेळी मान्यता देण्यात आली. त्यामध्ये अनुसूचित जाती ११ टक्के, अनुसूचित जमाती ६ टक्के, दिव्यांग ५ टक्के, नागपूर सुधार प्रन्यास कर्मचारी २ टक्के आणि राज्य शासकीय/निमशासकीय कर्मचारी ५ टक्के असे आरक्षण ठेवण्यात आले आहे. आरक्षित घटकातील घरकुलास पात्र लाभार्थी उपलब्ध न झाल्यास ही घरकुले सर्वसाधारण गटात सोडतीद्वारे वाटप करण्यास मान्यता देण्यात आली.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat