दहशतवाद्यांच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी पाकिस्तान मजबूर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jul-2019
Total Views |

 
 
 

हाफीस सईदसह अन्य तिघांविरोधात तक्रारी दाखल

 
 

 

लाहोर : मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सुत्रधार आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी हाफिज सईदविरोधात पाकिस्तानात खटला दाखल केला आहे. पाकिस्तानातील दहशतवादविरोधी पथकाने तीन शहरांत हाफिज आणि त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध २३ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

 
 

अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवादविरोधात प्रबळ कारवाई केली नाही तर निर्बंध लावू असा इशारा दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानने आपल्या देशातील सर्वात कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवाद्याच्या म्हुस्क्या आवळण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पाकिस्तानच्या दहशतवादीविरोधी पथकाने दिलेल्या माहीतीनुसार, जमात-उद-दावा आपल्या जवळच्या दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवतात. यासाठी जमातकडून पाच वित्तीय संस्थांचा वापर केला जातो.

 
 

हाफिज सईद हाच जमातचा म्होरक्या आहे. पाकिस्तानने लाहोरसह तीन शहरांत २३ एफआयआर दाखल करण्यात आल्या. त्यामध्ये लश्कर-ए-तोयबासह फलाह-ए-इंसानियतच्या सदस्यांचा समावेश आहे. हाफिज सईद ठिक-ठिकाणी सभा संमेलने घेऊन दहशतवाद्यांसाठी पैसा गोळा करतो. आणि आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून दहशतवादी संघटनांना पाठवतो असे तपासातून उघड झाले आहे.

 
 

यात अल-अनफाल, दावत-उल-इरशाद, अल हमद, अल मदीना आणि मौज बिन जबल आदी संस्थांचा सामावेश आहे. सर्व प्रकरणांची सुनावणी दहशतवादविरोधी न्यायालयात केली जाईल. २६ सप्टेंबर २००८ च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड सईदला अमेरिकेने २०१२ मध्ये आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले. तरीही पाकिस्तानात तो मोकाट फिरत आहे. पाकिस्तान आतापर्यंत या कुख्यात दहशतवाद्याला धर्मगुरू म्हणत आला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@