पृथ्वी शॉवर ८ महिन्यांचे निलंबन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर पृथ्वी शॉ एका कारणामुळे चांगलाच अडचणीत आला आहे. त्याच्यावर ८ महिन्याच्या नामुष्कीची वेळ आली. डोपिंग चाचणीत दोषी ठरल्याने बीसीसीआयने त्याला आठ महिन्यांसाठी निलंबीत केले आहे. श्वसननलिकेच्या संसर्गावर घेतलेल्या औषधातून आपण अजाणतेपणी टर्ब्युटॅलिनचे सेवन केल्याचे पृथ्वीने मान्य केले आहे.

 

खोकल्याच्या औषधात टर्ब्युटॅलिनचा सर्रास वापर करण्यात येतो. इंदूरमधल्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या कालावधीत झालेल्या उत्तेजक चाचणीत पृथ्वीच्या शरीरात टर्ब्युटॅलिनचे अंश सापडले होते. बीसीसीआयने मंगळवारी सांगितले की, 'पृथ्वी शॉ ने उत्तेजक पदार्थांचे सेवन केल्याने त्याच्यावर ही कारवाई केली आहे. हा पदार्थ साधारणपणे खोकल्याच्या औषधांमध्ये आढळतो. त्याने या पदार्थाच सेवन केल्याने हे डोपिंग नियमांचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळेच त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे’, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

 

"मी माझी चूक प्रामाणिकपणे स्वीकारत आहे. गेल्या स्पर्धेदरम्यान दुखापतग्रस्त असताना औषधे घेताना माझ्याकडून हे घडले असावे. क्रिकेट हे माझे आयुष्य असून मुंबईचे तसेच देशाचे प्रतिनिधित्व करणे हेच माझ्यासाठी सर्वाधिक अभिमानास्पद आहे. लवकरात लवकर दमदार पुनरागमन करण्याचा माझा मानस आहे. तसेच, युवा खेळाडूंनी औषधे घेताना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. माझ्या या चुकीमुळे अन्य खेळाडूंना समज मिळेल. खेळाडूंनी ‘वाडा’च्या नियमांचे पालन करण्याची नितांत आवश्यकता आहे.’" असे भावनिक ट्विट करत पृथ्वीने स्वतःची चूक स्वीकारली.

@@AUTHORINFO_V1@@