'साहो' मधील 'एन्नी सोनी' गाण्याचा टीजर प्रदर्शित

    30-Jul-2019
Total Views | 58



दाक्षिणात्य
चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कलाकार प्रभास आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत असलेल्या बहुचर्चित 'साहो' या चित्रपटातील 'सायको सैय्या' या गाण्याच्या यशानंतर 'एन्नी सोनी' या गाण्याचा टीजर आज प्रदर्शित करण्यात आला. प्रभास आणि श्रद्धा या दोघांवर चित्रित करण्यात आलेले हे एक रोमँटिक गाणे आहे.  संपूर्ण गाणे ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


सायको सैय्या हे एक पार्टी सॉंग होते तर आत्ताचे नवीन गाणे एक रोमँटिक सॉंग आहे. त्यामुळे गाण्याच्या चित्रीकरणामध्ये खूप सुंदर अशी सिनरी दिसत आहे. या गाण्याला नुकताच प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या गुरु रांधवा याने तर त्याच्याबरोबर तुलसी कुमार ने पार्श्वगायन केले आहे. तर गुरु रांधवा यानेच हे गाणे लिहिले आणि संगीतबद्ध केले आहे.




माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121