पाकिस्तानात फाळणीनंतर पहिल्यांदाच उघडले या मंदिराचे दरवाजे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jul-2019
Total Views |
 


इस्लामाबाद : पाकिस्तानातील सियालकोट भागांत तब्बल एक हजार वर्ष जूने असलेले मंदिर फाळणीनंतर पहिल्यांदाच पूजेसाठी खुले करण्यात आले आहे. एका पाकिस्तानातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिकांनी केलेली मागणी मान्य करत या मंदिराचे प्रवेशद्वार खुले करण्यात आले आहे. दिवंगत लेखक यांच्या 'हिस्ट्री ऑफ सियालकोट' या पुस्तकातील संदर्भानुसार हे मंदिर एक हजार वर्षे जूने असल्याचे सांगितले जात आहे. लाहोरपासून शंभर किमी दूर असलेले मंदिर धारोवाल क्षेत्रामध्ये वसलेले आहे.



 

या मंदिराचे नाव शवाला तेजा सिंह मंदिर आहे. पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांच्या पवित्र स्थानाची देखरेक करणारी इवेक्यु ट्रस्ट प्रोपर्टी बोर्डने स्थानिक हिंदू नागरिकांची मागणी मान्य करत भारत-पाक फाळणीनंतर पहिल्यांदाच हे मंदिर खुले केले आहे. यापूर्वी या भागात हिंदू धर्मीयांची संख्या इतकी नव्हती म्हणून हे मंदिर बंद ठेवण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. पाकिस्तानातील हिंदू अल्पसंख्यांकाची संख्या एकूण ७५ लाख आहे, अशी अधिकृत आकडेवारी सांगते. मात्र, नव्या गणनेनुसार आता तो आकडा ९० लाख इतका होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@