'जजमेंटल है क्या' चित्रपटावर वाङ्मय चौऱ्याचा आरोप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jul-2019
Total Views |


कंगना राणावतमुळे आधीपासूनच चर्चेत असलेल्या 'जजमेंटल है क्या' हा चित्रपट वादाच्या भवऱ्यात सापडला आहे. एकता कपूरची निर्मिती असलेला हा चित्रपट २६ जुलैला प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या पोस्टरमुळे एका हंगेरियन कलाकाराने वाङ्मय चौऱ्याचा आरोप चित्रपटकर्त्यांवर केला आहे.


फ्लोरा बोरसी नावाच्या एका हंगेरियन कलाकाराने हा मुद्दा आज समोर आणला आहे. तो एक छायाचित्रकार आणि व्हिज्वल आर्टिस्ट असून त्याने स्वतः बनवलेली कलाकृती आणि कंगना राणावत वर चित्रित करण्यात आलेले पोस्टर या दोन्ही गोष्टी सोशल मिडीआयवर शेअर करत, यामध्ये काही फरक दिसतो का असा उपरोधात्मक प्रश्न विचारला आहे. त्याचबरोबर 'जजमेंटल है क्या' च्या चित्रपटकर्त्यांनी याविषयी कोणतीच परवानगी मागितली नसल्याचा खुलासा देखील याच पोस्टमध्ये केला आहे.

त्याचबरोबर एका नावाजलेल्या चित्रपटकर्त्यांना हे वागणे शोभते का असे देखील त्याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. आता या प्रकरणात नक्की काय खरे आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.



माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@