‘बाबा’चित्रपटात बालकलाकार आर्यन मेंघजी दिसणार वेगळ्या भूमिकेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jul-2019
Total Views |



गुंतागुंतीच्या
आणि आव्हानात्मक अशा भूमिकांसाठी प्रत्येक कलाकार हा खूप मेहनत घेत असतो. बालकलाकार आर्यन मेंघजीही त्याला अपवाद नाही. तोबाबाचित्रपटात प्रेक्षकांना वेगळ्या भूमिकेत बघायला मिळणार आहे. त्याच्यासाठी ही भूमिका खूपच आव्हानात्मक होती, ती त्याने पडद्यावर त्याच ताकदीने साकारली आहे. ‘बाबाचित्रपट ऑगस्ट २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. आगळ्या अशा कथेवर बेतलेला, पण क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारी पटकथा आणि तिला तेवढ्याच सशक्त अभिनयाची जोड रसिकांसमोर येत असल्याने या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. ‘भावनेला भाषा नसते’, हा सरळसाधा संदेशबाबाचित्रपटातून देण्यात आला आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कोकणात चित्रित झालेला हा चित्रपट पाहणे चाहत्यांसाठी पर्वणी असणार आहे.


आघाडीच्या कलाकारांबरोबर काम करताना आर्यननेही स्वतःची प्रतिभा सिद्ध केली आहे. तो म्हणतो की या चित्रपटाबद्दल त्याला खूप उत्कंठा लागून राहिली आहे. या चित्रपटाबद्दलच्या तयारीबद्दल बोलताना तो म्हणतो, 'बाबा' मध्ये काम करताना मला खुप मज्जा आली. मी यामध्ये शंकर नावाचं पात्र साकारलं आहे. मी या सिनेमामध्ये दीपक सर, नंदिता पाटकर, अभिजीत सर, जयवंत वाडकर यांच्याबरोबर काम केले आहे आणि राज आर गुप्ता यांनी दिग्दर्शन केले आहे. चित्रपटातील माझी भूमिका खूपच आव्हानात्मक होती. ती साकारताना मला खूप मजा आली’.


अवघ्या नऊ वर्षांच्या आर्यनने गणपती बाप्पा मोरया, कुलस्वामिनी या मराठी आणि अशा अनेक हिंदी टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजीया सध्या गाजत असलेल्या मराठी ऐतिहासिक मराठी मालिकेमध्ये त्याने छोट्या राजाराम राजेंची भूमिका केली आहे. या आधी१५ ऑगस्टचित्रपटातील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे त्यामुळे 'बाबा' चित्रपटामध्ये त्याच्या कामाविषयी प्रेक्षकांना काय वाटते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat
@@AUTHORINFO_V1@@