कार नदीजवळ थांबवून सीसीडीचे मालक व्ही. जी. सिद्धार्थ बेपत्ता : आत्महत्या केल्याचा संशय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jul-2019
Total Views |




कर्नाटक पोलीसांकडून शोधमोहिम सुरू




मंगळूरू : 'कॅफे कॉफी डे' या देशातील सर्वात मोठ्या रेस्टॉरंट चेनचे मालक, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम कृष्णा यांचे जावई व्ही. जी. सिद्धार्थ हे सोमवारपासून बेपत्ता आहेत. सोमवारी दि. २९ जुलै रोजी ते त्यांच्या गाडीने प्रवास करत होते. मात्र, त्यानंतर त्यांचा काहीच पत्ता लागत नसल्याचे वृत्त आहे. मंगळुरू येथील नेत्रावती नदी परिसरात ते असल्याची माहिती मिळाली होती, त्याआधारे कर्नाटक पोलिसांनी नदी आणि आसपासच्या परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.

 

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, काँग्रेस नेते डीके शिवकुमार, बीएस शंकर आदी एस. एम. कृष्णा यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. सिद्धार्थ यांचा फोनही बंद असल्याने त्यांच्याशी काहीच संपर्क होत नाही. सिद्धार्थ सोमवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास नेत्रावती नदीच्या पुलाजवळ कारमधून उतरले. त्यांनी ड्रायव्हरला लगेचच येतो असे सांगितले होते. मात्र, अर्धा तास उलटल्यावरही त्यांचा पत्ता लागला नाही. त्यानंतर त्यांच्याशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. यानंतर त्यांच्या ड्रायव्हरने ते बेपत्ता असल्याची माहिती घरच्यांना दिली.

 

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच त्यांनी नदी आणि आसपासच्या परिसरात शोधमोहीम वेगाने सुरू केली. सिद्धार्थ हे बेपत्ता होण्याआधी काही वेळ त्यांचा ड्रायव्हर त्यांच्या सोबत असल्याने पोलीस ड्रायव्हरची चौकशी करत आहेत. व्ही. जी. सिद्धार्थ यांनी घटनेच्या पूर्वी कुणाला संपर्क केला त्याचाही पोलीस कॉल डीटेल्सद्वारे तपास घेत आहेत.

 

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांचे जावई व्ही. जी. सिद्धार्थ हे कॅफे कॉफी डे (सीसीडी) ग्रुपचे संस्थापक, मालक व अध्यक्ष आहेत. सिद्धार्थ १७ जानेवारी २०१५ रोजी या कंपनीचे अध्यक्ष झाले. एस. एम. कृष्णा हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला. ते काही काळ महाराष्ट्राचे राज्यपाल व त्याआधी केंद्रातही मंत्री होते.



 

 

गुंतवणूकदारांना लिहीले होते पत्र

पोलीसांना तपासादरम्यान एक पत्र हाती लागले आहे. त्यात ते म्हणाले, "मी खूप संघर्ष केला आहे. मात्र एक इक्विटी पार्टनर म्हणून आणखी दबाव सहन करू शकत नाही. ते माझ्यावर शेअर बायबॅक करण्यासाठी दबाव टाकत आहेत. हे मी आणखी सहन करू शकत नाही. मी गुंतवणूकदारांची माफी मागत आहे.", अशा आशयाचे पत्र पोलीसांना आढळले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@