अमेय आणि सईने असे पूर्ण केले शाल्मलीचे डान्स चॅलेंज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jul-2019
Total Views |


उपेंद्र सिधये यांनी दिग्दर्शनातून चित्रपट सृष्टीत पदार्पण केलेला 'गर्लफ्रेंड' हा चित्रपट या महिन्याच्या २६ तारखेला प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद तर मिळत आहेच पण पार्श्वगायिका शाल्मली खोलगडे आणि जसराज जोशी यांनी गायलेलेले 'केरिदा केरीदो' हे स्पॅनिश आणि मराठीमधील गाणे प्रेक्षकांना भलतेच आवडलेले दिसत आहे. दरम्यान शाल्मलीने दिलेले डान्स चॅलेंज चक्क नचिकेत आणि अलिशाने सुद्धा पूर्ण केले. त्याचा व्हिडीओ नचिकेतने म्हणजेच अमेय वाघने सोशल मिडीआयवर शेअर केलाय.

 

 

गर्लफ्रेंड चित्रपटातील 'केरिदा केरीदो' या गाण्याचे शब्द क्षितिज पटवर्धन यांनी लिहिले आहेत. गर्लफ्रेंड चित्रपटातील 'नच्या गॉट गर्लफ्रेंड', लव्ह स्टोरी आणि 'कोडे सोपे थोडे' हे बाकीची तीन गाणी असून ती सुद्धा तितकीच प्रसिद्ध झाली आहेत. अमेय वाघ आणि साई ताम्हणकर यांच्या केमेस्ट्रीला देखील प्रेक्षकांनी पसंती दिली आता जोडी चित्रपटाला किती प्रसिद्धी मिळवून देते हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@