अक्षय कुमारने स्वीकारला जगन शक्तीचा आणखी एक चित्रपट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jul-2019
Total Views |



खिलाडी
अक्षय कुमार सध्या मिशन मंगल या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेच मात्र आणखी एका गोष्टीमुळे तो चर्चेत येणार आहे. याचे कारण म्हणजेइक्काहा त्याचा आगामी चित्रपट. मिशन मंगल येत्या १५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे त्यापूर्वीच अक्षय कुमारने आणखी एक चित्रपट साइन केल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे 'इक्का' या त्याच्या आगामी चित्रपटामध्ये त्याचा डबल रोल असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.


मिशन मंगलचेच दिग्दर्शक जगन शक्ती 'इक्का' हा चित्रपट देखील दिग्दर्शित करत आहेत त्यामुळे त्यांच्या सलग दुसऱ्या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत झळकणार आहे ही एक औत्सुक्याचे गोष्ट आहे. तामिळ चित्रपट सृष्टीतील 'कठ्ठी' या चित्रपटाचा 'इक्का' हा अधिकृत रिमेक आहे. 'मिशन मंगल' नंतर त्याने स्वीकारलेला हा दुसरा चित्रपट आहे. 'इक्का' बरोबरच त्याचा 'बच्चन पांडे' हा चित्रपट देखील आगामी वर्षात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@