डोंबिवली स्थानकात एका रुपयात झाली महिलेची डिलिव्हरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jul-2019
Total Views |



डोंबिवली : डोंबिवली स्थानकात एका गर्भवतीची सुखरूप प्रसुती करण्यात आली आहे. प्रसुतीकळांनी त्रस्त महिलेला बुधवारी सकाळी कामा रुग्णालयात नेले जात होते. मात्र, पाऊस आणि मेगाब्लॉकमुळे त्यांना रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाला. डोंबिवली स्थानकानजीक असलेल्या 'वन रुपी क्लिनीक'मध्ये डॉक्टरांनी प्रसंगावधात राखत महिलेची सुखरूप डिलिव्हरी केली. डॉ. स्मिता उप्पड आणि त्यांच्या टीमने यशस्वीपणे प्रसुती केल्यानंतर अवघा एक रुपया फी म्हणून घेतला. महिला व बाळ दोन्ही सुखरुप असून त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

 

मध्य रेल्वे आणि मॅजिक दल यांच्या सहाय्याने सुरू असलेल्या वन रुपी क्लिनिकमध्ये रुग्णांवर तत्काळ उपचार केले जातात. या क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल घुले यांच्या आयुष्यात असाच एक अपघात घडला होता. कुलाबा येथे जात असताना त्यांच्या आई-वडिलांचा गंभीर अपघात झाला. त्यावेळी मेंदूतून रक्तस्त्राव झाल्याने त्यांना सहा महिने अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. अपघातानंतर रुग्णावर उपचार किती आवश्यक असल्याचे लक्षात घेत त्यांनी वन रुपी क्लिनिकची संकल्पना मांडली. मध्य रेल्वेच्या स्थानकांत ही सोय उपलब्ध आहे. त्यासह सवलतीच्या दरात आवश्यक तपासण्या व औषधेही येथे उपलब्ध आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@