कर्करोग पेशींचीच आत्महत्या?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jul-2019   
Total Views |


 

 
कॅन्सर हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवणारा रोग आहे. त्यामुळे पेंसिल्वेनिया विद्यापीठातील डॉ. कॉन्सटेन्टीनोस कॉमेनिस या प्राध्यापकाने पेशींचा अभ्यास करून कॅन्सरवर मात करण्यासाठी एक नवीन संशोधन केले आहे. डॉ. कॉमेनिस यांच्या या संशोधनानुसार कॅन्सरपीडितांच्या शरीरातील कॅन्सरच्या पेशी कोणत्या औषधांशिवाय नाही तर स्वतःच स्वतःचा नायनाट करू शकणार आहेत, म्हणजे या कॅन्सरच्या पेशींना आत्महत्या करावी लागणार आहे. 
 

घड्याळ्याच्या काट्यांवर धावणारे धकाधकीचे जीवन आणि बदलती जीवनशैली यामुळे अनेक आजारांना आपण आपसुकच आमंत्रण देत असतो. यातील काही आजारांवर उपचार शक्य असतात, तर काही आजार जीवघेणे ठरतात. याच धकाधकीच्या जीवनातून उद्भवणार्‍या आजारांपैकी एक म्हणजे कर्करोग. कर्करोगाचे नाव ऐकले तरी सर्वसामान्य माणसाच्या मनात धडकी भरते, तर भल्याभल्यांच्या जीवाचा थरकाप उडतो. म्हणूनच आपल्याकडे कर्करोग हा जीवघेणा आजार असल्याचा समज असून तो जीवनाचा शेवटच मानला जातो. एका अहवालानुसार, भारतात एक लाख भारतीयांमागे 100 भारतीय हे कॅन्सरग्रस्त असल्याचे मानले जाते, तर जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, 2018 या वर्षात जगभरात एक कोटी लोकांना कर्करोगामुळे आपला जीव गमवावा लागला आहे, तर कर्करोगपीडितांमध्ये तब्बल दोन कोटी रुग्णांची भर पडली आहे. याच जागतिक आरोग्य संघटनेने भारताबद्दल भीतीदायक असा अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या एका अभ्यासानुसार, भारतात 2020 पर्यंत कर्करोगाचे प्रमाण खूप वाढलेले असेल. धक्कादायक म्हणजे, दर तीन भारतीयांपैकी एकाला कर्करोगाची लागण होण्याची भीती या अभ्यासात वर्तविण्यात आली आहे.

 

कर्करोग हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवणारा रोग. त्यामुळे पेन्सिल्वेनिया विद्यापीठातील डॉ. कॉन्सटेन्टिनोस कॉमेनिस या प्राध्यापकाने पेशींचा अभ्यास करून कर्करोगावर मात करण्यासाठी एक नवीन संशोधन केले आहे. डॉ. कॉमेनिस यांच्या या संशोधनानुसार, कर्करोगपीडितांच्या शरीरातील कर्करोगाच्या पेशी कोणत्या औषधांशिवाय नाही, तर स्वतःच स्वतःचा नायनाट करू शकणार आहेत, म्हणजे या पेशींना आत्महत्या करावी लागणार आहे. डॉ. कॉमेनिस यांचे हे संशोधन जर यशस्वी झाले, तर जगभरातील कर्करोगग्रस्तांना व त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण, कर्करोगावरील दररोज होणारे नवनवीन संशोधन, अचूक निदान करणार्‍या उपचारपद्धती आणि दररोज नव्या औषधांची पडणारी भर यामुळे आज 58 टक्के कर्करोग बरे होतात किंवा आटोक्यात राहू शकतात. मात्र, उर्वरित कर्करोग पीडितांना आपला जीव गमवावा लागतो. म्हणूनच डॉ. कॉमेनिस यांचे हे नवीन संशोधन महत्त्वाचे ठरते.

 

शरीरातील लाखो पेशी आपल्याला आजारांपासून दूर ठेवण्यासाठी लढत असतात. धोकादायक पेशींपासून शरीराला वाचण्यासाठी या पेशी स्वतःचा जीव धोक्यात टाकतात. याच मृत किंवा जुन्या झालेल्या पेशी आणि कोशिकांच्या जागी आपले शरीर नव्या पेशी तयार करत असते. याचमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती नियंत्रित राहते व आपले शरीर अनेक आजारांशी लढत राहते. मात्र, मृत पेशींच्या तुलनेत अधिक वेगाने नव्या पेशींची वाढ होऊन त्या नियंत्रणाबाहेर जातात. तेव्हा आपली रोगप्रतिकारशक्ती निकामी ठरते व पेशींची अमर्याद वाढ नियंत्रणात ठेवण्यात असमर्थ ठरते, तेव्हा कर्करोगाचा धोका अधिक असतो किंवा व्यक्ती कर्करोगपीडित झालेली असते. या अनियंत्रित वाढीव पेशींमधील द्रव्ये, घटक हे ट्यूमरमध्ये रुपांतरित होतात व शरीरावर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू करतात. याच पेशींचा नायनाट करण्याच्या आज अनेक पद्धती असल्या तरी डॉ. कॉमेनिस यांचे संशोधन प्रभावी ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण, डॉ. कॉमेनिस यांच्या टीमला जनुकांमध्ये काम करणारा ‘एटीएफ-4’ नावाचा रासायनिक मार्ग सापडला आहे. ‘एटीएफ-4’ कर्करोगाच्या पेशींना अडवून ठेवतात. यामुळे कर्करोगाच्या पेशी अतिरिक्त प्रोटीनची निर्मिती करायला जातात व याच अतिरिक्त प्रोटीनच्या निर्मितीमुळे कर्करोग पेशींचा नायनाट होतो.

 

कर्करोगाची वाढ सहजासहजी होऊ नये यासाठी व या वाढीला कायमचा लगाम लावण्यासाठी कर्करोगावर संशोधन करताना यात अधिक खोलवर जाण्याची गरज आहे. आमचे संशोधन याचसाठी असून आम्हाला यात काही प्रमाणात यश आले आहे. कर्करोगाचा उपचार करताना ‘एटीएफ-4’ ला लक्ष्य करणे गरजेचे आहे, कारण याच ठिकणी कर्करोगाच्या पेशींचा मार्ग अडवला जातो. यामुळे कर्करोगाचा कायमस्वरूपी नायनाट करता येऊ शकतो,” असे डॉ. कॉमेनिस यांनी सांगितले. त्यामुळे आता डॉ. कॉमेनिस यांचे संशोधन आगामी काळात उपचारपद्धतीमध्ये वापरले गेल्यास, तो जगभरातील कर्करोग पीडितांसाठी हा मोठा दिलासा ठरु शकतो.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@