'कबीर सिंह' मधील श्रेया घोषालने गायलेले गाणे प्रदर्शित

    03-Jul-2019
Total Views |


 

संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित कबीर सिंह या चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर सध्या सरशी केली आहे दरम्यान या चित्रपटातील एक सुमधुर गाणे आज प्रेक्षकांच्या भेटीस आले. सर्वांची लाडकी गायिका श्रेया घोषाल हिने गायलेले 'ये आइना' हे नवीन गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून त्याला आत्तापर्यंत लाखांपेक्षा जास्त प्रेक्षकांचा प्रतिसाद देखील मिळाला.

'ये आइना' या गाण्याचे शब्द इर्शाद कामिल यांनी लिहिले असून अमाल मलिक याने संगीतबद्ध केले आहे. गाण्यामध्ये सुमधुर असा आवाज, मृदू शब्द आणि संगीत यामुळे हे गाणे कानांना अतिशय गोड भासते. श्रेया घोषालच्या गायनाविषयी तर प्रेक्षक कायमच उत्सुक असतात त्यामुळे या निमित्ताने पुन्हा एकदा श्रेया घोशालचे स्वर प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहेत. कबीर सिंह हा चित्रपट गेल्या २१ जूनला प्रदर्शित झाला असून चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
 

 

'कबीर सिंह' या चित्रपटामध्ये शाहिद कपूर आणि किआरा अडवाणी यांच्या केमेट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे आता या गाण्याला प्रेक्षकांची किती पसंती मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे .






माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat