ये रे ये रे पैसा चा ट्रेलर प्रदर्शित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jul-2019
Total Views |



'पोस्टर गर्ल', बघतोस काय मुजरा कर' या चित्रपटानंतर हेमंत ढोमे आणखी एक चित्रपट दिग्दर्शित करत आहे ज्याचे नाव आहे 'ये रे ये रे पैसा '. येत्या ऑगस्टला हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीस आला असून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हा दमदार ट्रेलर तुमच्या चेहऱ्यावर एक हसू आणेल यात शंका नाही. या ट्रेलरमध्ये नवीन डावपेच आणि पैशासाठीचा नवा डाव मांडला आहे. या डावात आता कोणाचा विजय होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

'ये रे ये रे पैसा' मध्ये उमेश कामत, तेजस्विनी पंडित, सिद्धार्थ जाधव आणि संजय नार्वेकर यांनी आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली आता 'ये रे ये रे पैसा २' मधून पुन्हा एकदा संजय नार्वेकर आणि त्याच्यासह मृणाल कुलकर्णी, अनिकेत विश्वासराव, प्रसाद ओक, आनंद इंगळे, मृण्मयी गोडबोले आणि विशाखा सुभेदार,प्रियदर्शन जाधव, पुष्कर श्रोत्री, स्मिता गोंदकर आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी येत आहेत.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@