बेअर ग्रिल्स VS नरेंद्र मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jul-2019
Total Views |

 

 


'मॅन व्हर्सेस वाईल्ड' कार्यक्रमात पंतप्रधान मोदी झळकणार

  

मुंबई (प्रतिनिधी) : 'ड़िस्कवरी' वाहिनीवरील प्रसिद्ध 'मॅन व्हर्सेस वाईल्ड' या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी झळकणार आहेत. येत्या १२ आॅगस्ट रोजी रात्री ९ वाजता या विशेष भागाचे प्रक्षेपण होईल. काही वेळापूर्वी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक बेअर ग्रिल्स यांनी यासंदर्भातील प्रोमो व्टिट केला असून त्यामध्ये पंतप्रधान मोदी ग्रिल्स समवेत जंगलाची साहसी सैर करत असल्याचे दिसत आहे.

 
 

पर्यावरण व साहसप्रेमींमध्ये 'मॅन व्हर्सेस वाईल्ड' या कार्यक्रमाची प्रचंड लोकप्रियता आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक बेअर ग्रिल्स हे त्यांच्या साहसी उपक्रमांकरिता प्रसिद्ध आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यानंतर आता आपल्याला या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसणार आहेत. काही महिन्यांपूर्वी मोदी यांनी ग्रिल्स यांच्यासोबत या मालिकाकरिता विशेष भागाचे चित्रीकरण केले होते. भारतामधील प्रसिद्ध नद्या आणि जंगलांमध्ये हे चित्रीकरण पार पडले. हा भाग १२ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध होणार आहे. ग्रिल्स यांनी याविषयीची माहिती व्टिटरव्दारे दिली.

 
 

'१८० देशातील लोकं लवकरच पंतप्रधान मोदी यांची न पाहिलेली बाजू बघतील', असे व्टिट करत गिल्स यांनी या विशेष भागाचा प्रोमो प्रसिद्ध केला आहे. वन्यजीव संवर्धन आणि हवामान बदल यासंदर्भात प्रबोधन करण्यासाठी मोदीजी या भागात सहभागी झाल्याचे गिल्स यांनी नमूद केले आहे. मोदी यांचा हा विशेष भाग १८० देशातील लोकं पाहू शकतील. ग्रिल्स यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रोमोमध्ये पंतप्रधान मोदी भारतातील जंगल आणि नद्यांची सैर करत असल्याचे दिसतात. तसेच ते ग्रिल्स सोबत स्वच्छंदपणे वावरत आहेत. त्यांनी या भागामध्ये 'रिव्हर राफटिंग'ही केली आहे. पंतप्रधान मोदींनी देखील या संदर्भातील माहिती आपल्या व्टिटर अकाऊंटव्दारे दिली असून पर्यावरण संवर्धनासंदर्भात प्रबोधन करण्यासाठी आम्ही देशातील विविध भागांमध्ये भटकंती केल्याचे म्हटले आहे.

 
 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@