नक्षल्यांचा शहीद आठवडा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jul-2019
Total Views |




गडचिरोलीमधील गोकुळ उर्फ संजू सन्नू मडावी, रतन उर्फ मुन्ना, शैला उर्फ राजे मंगळू हेडो, जरिना उर्फ शांती दानू होयामी, मीना धूर्वा, भिकारी कुंजामीसरिता उर्फ मुक्ती मासा कल्लो या सहा नक्षल्यांनी पोलिसांकडे आत्मसमर्पण केले आहे. सर्वांना पकडण्यासाठी सरकारने लाखोंची बक्षिसे लावली होती. २८ जुलै ते ३ ऑगस्ट हा आठवडा नक्षलींनी 'शहीद स्मृती दिन' म्हणून घोषित केला होता. सहाजणांनी नक्षल्यांनी घोषित केलेल्या शहीद स्मृती आठवड्याच्या एक दिवस आधी हे आत्मसमर्पण केले आहे. शहीद स्मृती आठवडा म्हणजे काय? हे शहीद कोण? देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशाच्या कल्याणासाठी किंवा समाजाच्या भल्यासाठी मृत्यू पत्करणारे हे शहीद होते का? मानवी आयुष्याला उभारी आणि सकारात्मकता देणार्‍या मूल्यांवर काम करण्यासाठी त्यांनी मृत्यू पत्करला होता का? तर या प्रश्नांचे उत्तर आहे, 'बिलकुल नाही.' तर मग हा शहीद आठवडा जनतेने का मानावा? मारले गेलेले सर्वच नक्षली भ्याड आणि क्रूरच होते. त्यांनी असहाय्य, निरपराध नागरिकांचे मुडदे पाडले. दुर्गम भागातील वनवासींच्या जीवनात कधीही सुखाची पहाट येऊ नये, म्हणून मृत नक्षल्यांनी जिवंत असताना गावकर्‍यांवर शब्दातीत दहशत ठेवली होती. एकही सरकारी योजना, सवलत गावकर्‍यांना मिळू नये, म्हणून या नक्षल्यांनी इथली सगळीच विकासकामे शस्त्राच्या जोरावर बंद पाडली होती. विकासकामे नाही, प्रगती नाही, या सर्व दुष्टचक्रात इथला समाज अडकवण्याचे काम नक्षलींनी केले. हे सर्व करता करता कायदा सुव्यवस्था, संविधान, घटना या सार्‍यांवरच हल्ला केला. त्या हल्ल्याला सरकारने, प्रशासनाने चोख उत्तर दिले. त्यात हे नक्षली मारले गेले. अशा या नक्षलींचा शहीद स्मृती आठवडा? लोकांना न्याय देतो, असे म्हणणारे नक्षली प्रत्यक्षात लोकांवर अनन्वित अत्याचार आणि अन्यायच करतात, हे लोकांना माहिती झाले. त्यामुळे नक्षल्यांना लोकांकडून समर्थन आणि सहानुभूती मिळताना दिसत नाही. त्यामुळे पूर्वी स्थानिक लोक नक्षल्यांच्या दहशतीने त्यांच्यासमोर मान तुकवित असत, घाबरत असत पण आता स्थानिक तरुण नक्षलींनी लावलेल्या शहीद स्मृती आठवड्याचे बॅनर जाळताना दिसत आहेत. हे एक परिवर्तन आहे. या परिवर्तनाच्या लाटेत नक्षली मुळासकट उखडले जातील, अशी आशा बाळगायला हरकत नाही.

 

नक्षल्यांना घरघर

 

नक्षली विचारधारेला पोसणार्‍या तथाकथित बुद्धिवादी जिवांना काही वर्षांपूर्वी अक्षरशः पोसले जात होते. पण २०१४ साली सत्तांतर झाले. देश आणि समाजविघातक कृत्य करणार्‍यांचे खात्मा करणारे सरकार स्थापन झाले. त्यानंतर नक्षली कारवायांमुळे सदासर्वकाळ होरपळणार्‍या राज्यांमध्येही नक्षली कारवाईची धार बोथट झालेली दिसली. मात्र, तरीही नक्षल्यांच्या भ्याड हल्ल्याने बरीच जीवित आणि स्थावर हानी झाली आहे, हे नक्कीच. त्यामुळे नक्षल्यांनी जाहीर केलेल्या शहीद स्मृती आठवड्यामध्ये काही वावगे घडू नये, याची काळजी प्रशासनाने घेतली आहे. सोबतीला जनताजनार्दनही आहे. असो. नक्षल्यांनी छत्तीसगढ, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिसा, झारखंड या राज्यांमध्ये हातपाय पसरले होते. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारने नक्षलविरोधी अवलंबलेले कठोर धोरण, पोलिसांनी राबवलेली नवजीवन योजना, नक्षलीविरोधी लोकजागरण या सर्वांमुळे देशातील नक्षली कारवाया लक्षणीयरित्या घटल्या आहेत. तरुणांना आमिष दाखवून किंवा दबाव टाकून नक्षली होण्यास भाग पाडले जायचे. त्यांना पुन्हा समाजात यायची इच्छा असायची, पण मार्ग नसायचा. मात्र, आता परिस्थिती पालटत आहे. केंद्र सरकारने नक्षल्यांच्या आत्मसमर्पणसाठी बर्‍याच योजना आखल्या आहेत. त्यामध्ये समर्पण केलेल्या माजी नक्षली तरुण-तरुणींनाच नक्षल विरोधी कारवायांमध्ये सामील करणे, त्यांचे सर्वच प्रकारे पुनर्वसन करणे हेही ओघाने आले. याचा परिणाम म्हणून नक्षली कारवाया कमी झालेल्या दिसत आहेत. यावर केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी म्हणाले की, "सरकारची धोरणे व उपाययोजनांमुळे २०१८ मध्ये केवळ १० जिल्ह्यांत हिंसाचाराच्या घटना घडल्या." रेड्डी यांनी २०१४ सालापूर्वीची पाच वर्ष आणि २०१४ ते २०१९ पर्यंतच्या पाच वर्षांची तुलना केली. त्यानुसार नक्षली हिंसाचार आणि कारवायांमध्ये पाच वर्षांमध्ये ४३ टक्के घट झाली आहे. सरकारने २०१५ साली राष्ट्रीय धोरण व कृती योजना मंजूर केली होती. त्यानुसार नक्षलवादाचा मुकाबला सरकारने केला. यामध्ये सुरक्षा उपाययोजना, स्थानिक समुदायांना अधिकार अशा अनेक उपायांचा समावेश होता. या सर्वांसोबतच सरकार, प्रशासन, जनता यांची नक्षलविरोधाची तीव्र इच्छाशक्ती यामुळे नक्षली कारवायांना आळा बसला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@