विधानसभा निवडणूकीत २५० पार करु : चंद्रकांतदादा पाटील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jul-2019
Total Views |


ज्यांनी महाराष्ट्र लुटला, त्यांची सुटका कशी काय होणार ?


कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणूकीत अडिचशे जागांचा टप्पा पार करुन मजबूत सरकार असणार आहे. त्यामुळे ज्यांनी महाराष्ट्र लुटला, त्यांची सुटका कशी काय होणार ? त्यांचे हिशोब चुकते करावे लागणार, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी कोल्हापूरात केली.

 

कोल्हापूरातील केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित केलेल्या कार्यकर्त्याच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बोलत होते. या कार्यक्रमास आमदार अमल महाडीक, प्रश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, हिंदुराव शेळके, बाबा देसाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. जिल्हयाच्या कानाकोपऱ्यातून हजारो कार्यकर्ते आल्याने सभागृह आणि परिसर तुडुंब भरला होता.

 

कॉग्रेसमध्ये घराणेशाहीला महत्व असून महाराष्ट्रही दोन-अडीचशे घराण्यानींच चालविला आहे, असा घणाघात करुन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, यापूर्वी लोकांना पर्याय नव्हता, मात्र भारतीय जनता पार्टीच्या रुपाने आता लोकांना एक सक्षम पर्याय निर्माण झाला आहे. त्यामुळे लोक भाजपमध्ये येऊ लागले आहेत. आपल्या भागाच्या विकासाचे स्पप्न घेऊन लोक प्रवेश करत असून देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेसाठी कित्तेक विकास कामे केली आहेत.

 

५० हजार कोटी श्योतकऱ्यांच्या खात्यावर टाकले तर ३४ कोटी लोकांची बँकेत खाती उघडली आहेत. महाराष्ट्र शासनाने १८ हजार कोटींचे कर्जमाफी केली आहे. सामान्य माणूस आज सुखी होऊ लागला आहे. भारतीय जनता पार्टी ईडी, इनकम टॅक्‍स यांची भिती दाखवून पक्षात कोणालाही प्रवेश देत नसल्याचे सांगून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, "राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना स्वत:चे कार्यकर्ते स्वत: सांभाळता येत नाहीत. त्यांची माणसे त्यांना सांभाळता आली नाहीत."

 

तसेच जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार हे सहानुभूती मिळविण्यासाठी हा खोटा आरोप आहेत. मुळात इन्कम टॅक्‍स, ईडी, निवडणूक आयोग या स्वायत्त संस्था आहेत. गडहिंग्लज येथील कार्यक्रमात मी गमतीने भाजपात येता का? असे म्हणालो होतो.ते आले नाहीत म्हणून त्यांच्यावर छापे टाकले, हे म्हणने चुकीचे आहे. कारण अशा यंत्रणांना छापे टाकण्यासाठी दोन वर्षे मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे या छापा प्रकरणांशी आमचा कांहीही संबध नाही.

 

भारतीय जनता पार्टी हा एक भक्कम पर्याय उभा राहीला असलयाने इतर पक्षातील कार्यकर्ते या पक्षात येत आहेत. येत्या ३१ जुलैला मुंबईत मोठा राजकीय बॉम्ब फुटणार असून दरदहा दिवसांनी कोलहापूरातही बॉम्ब फुटेल. भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेशासाठी रांग लागली असून कोणावरही कसलाही दबाव वैगेरे नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

पंतप्रधान नेहरुंच्यानंतर प्रत्येक पंतप्रधान आपल्याच घराण्यातला असावा, असे कॉग्रेसचे राजकारण आहे. घराणेशाहीची ही परंपरा आजही शरद पवार पुढे चालवत आहेत. बारामती लढण्यासाठी त्यांना मुलगीच लागते. मावळसाठी त्यांना पार्थ पवारनेच लढवावी असे वाटते. विधानसभेला रोहित पवारच लागतो. तुमच्यातून माणसे बाहेर पडत आहेत. याचे कारण सुरवातीला लोकांकडे पर्याय नव्हता. मात्र आता सेनाभाजप मजबूत पर्याय असल्याने लोक मोठया संख्येने पक्ष प्रवेश करीत आहेत, असेही असेही प्रदेक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@