माफी मागा अन्यथा कारवाई; लोकसभा अध्यक्षांनी खडसावले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jul-2019
Total Views |

 

 
नवी दिल्ली : लोकसभेच्या पीठासीन अध्यक्ष रमादेवी यांच्याबद्दल अशोभनीय वक्तव्य केल्याबद्दल गेले २ दिवस लोकसभेत गदारोळ सुरु आहे. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आझम खान यांच्या वर्तनाची गंभीर दखल घेत सर्वपक्षीय नेत्यांसोबत तसेच मंत्र्यांची बैठक बोलावून चर्चा केली. आझम खान यांनी रमा देवी यांची बिनशर्त माफी मागावी. तसे न केल्यास लोकसभा अध्यक्षांना योग्य वाटेल ती कारवाई करतील, असे संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले. त्यामुळे सोमवारी लोकसभेत उपस्थित होणारे आझम खान यांच्याकडे लक्ष लागलेले असेल.
 
 गुरुवारी दुपारी तिहेरी तलाक विधेयकावरुन लोकसभेत चर्चा सुरू असताना आझम खान यांनी पीठासीन अधिकारी रमा देवी यांना उद्देशून काही अशोभनीय विधाने केली होती. त्यामुळे गुरुवारीही भाजपच्या सदस्यांनी क्षोभ व्यक्त केला आणि आज लोकसभेत शून्य प्रहरात बदायूँच्या भाजप खासदार संघमित्रा मौर्या यांनी हा पुन्हा मुद्दा उपस्थित केला. आझम खान यांनी रमा देवींविषयी केलेल्या विधानांबद्दल सभागृहाची क्षमा मागावी, अशी मागणी त्यांनी केली.
 
 

केंद्रीय वस्त्रोद्योग तसेच महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी, वित्त मंत्री निर्मला सीतारामन, मीनाक्षी लेखी, अनुप्रिया पटेल, सुप्रिया सुळे, कानीमोळी, मिमी चक्रवर्ती, नवनीत कौर राणा या महिला खासदारांनी आझम खान यांच्या अशोभनीय वर्तनाचा धिक्कार करीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे मागणी केली.

 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@