विवाह : करार की संस्कार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jul-2019
Total Views |

खासदार असदुद्दिन ओवैसी यांनी गुरुवारी लोकसभेत, तिहेरी तलाकविरोधी विधेयकाला विरोध करताना असे वक्तव्य केले की, इस्लाममध्ये लग्न म्हणजे र्ेंक्त करार असतो. जन्मजन्माचे नाते नसते. असे सांगत त्यांनी नकळत सनातन धर्मातील विवाहसंकल्पना किती श्रेष्ठ दर्जाची आहे, हे उघड करून टाकले आहे. कारण, आज सनातन धर्मातील विवाहसंस्थेवर, पाश्चात्त्य र्ेंेमिनिझमच्या (स्त्रीवाद) प्रभावात येऊन सतत आघात केले जात आहेत. ज्या अब्राहमिक रिलिजनपासून इस्लाम, ख्रिश्चन रिलिजन निघाले आहेत, त्यात स्त्रीला किती हीन दर्जा होता, हे सर्वांना माहीत आहे. पश्चिमेकडे तर स्त्रीला मनुष्याचाही दर्जा नव्हता. तो मिळावा म्हणून तिथल्या महिलांना प्रचंड संघर्ष करावा लागला. पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा तर र्ेंारच दूर राहिला. अशा संकुचित विचारांच्या लोकांचा र्ेंेनिमिझम आम्ही ‘आधुनिक’ म्हणून डोक्यावर घेत असतो आणि आमच्या येथील अतिशय उच्च दर्जाच्या विवाहसंस्थेवर आघात करत असतो, हे अतिशय दुर्दैवाचे आहे. आपल्याकडे विवाहाला नातेच नाही, तर संस्कार मानले आहे. ‘विवाहसंस्था’ असे आपण म्हणतो. एकूण 16 संस्कारांमध्ये विवाह हा केंद्रस्थानी आहे. भारताने विवाह म्हणजे र्ेंक्त शरीरसुखासाठी नर आणि मादी यांनी एकत्र येणे, असे कधीही मानले नाही. विवाहाला संस्कार म्हणून दर्जा देताना, भारतीय ऋषी-मनीषींनी किती व्यापक, उत्तुंग व सखोल विचार केला आहे, हे पाहिले, तर इस्लाम व ख्रिश्चन समाजातील विवाहसंकल्पना किती संकुचित आणि खुजी आहे हे लक्षात येईल. भारतीयांच्या मते, विवाहेच्छुक पुरुष व उपवर कन्या, शुचिर्भूत विद्वान ब्राह्मण, इष्टमित्र आणि अग्नी यांच्या साक्षीने पती-पत्नी म्हणून संबद्ध होतात, त्या संस्काराला विवाह म्हटला जातो. विवाहामुळे स्त्री व पुरुष या दोघांमधील संबंधांचे नियमन होते.
 
आपण भारतीय कुटुंबसंस्थेला र्ेंार महत्त्व देतो. कुटुंबसंस्था ही विवाहसंस्थेवर अवलंबून असते. परंतु, विवाहसंस्था ही कुटुंबसंस्थेपुरतीच मर्यादित नसते, तर तिचा समाजावरही र्ेंार मोठा प्रभाव पडत असतो. गुणी, नीतिमान, चारित्र्यसंपन्न, परोपकारी अशी विवाहित दाम्पत्ये समाजाच्याही उत्कर्षाला उपयोगी पडू शकतात; तसेच दुर्गुणी व अनीतिमान दाम्पत्ये समाजाचे विघटन करण्याला कारणीभूत होऊ शकतात. विवाहामुळे स्त्री-पुरुषांचा समाजविघातक उच्छृंखलपणा संयत होत असतो. समाजात वावरणार्या पुरुषाला जे नियंत्रण हवे असते, ते भार्येमुळे त्याला मिळू शकते. अविवाहित मनुष्य समाजात राहूनही समाजाशी त्याचे सामंजस्य होऊ शकत नाही. भार्या आल्यानंतर मात्र तो समाजाशी एकजीव होतो. विवाहाने त्याचे नात्या-गोत्याचे संबंध वाढतात आणि तेवढा त्याच्या जीवनात व्यापकपणा येतो. मनुष्याच्या ठिकाणी आत्मौपम्यबुद्धी (आप-पर भाव नसणे) जितकी वाढेल, तितका तो संयमी, नीतिमान, उपकारक आणि अहिंसक बनतो आणि आत्मौपम्यबुद्धीचा हा धडा पत्नी आणि कन्या-पुत्र यांच्या रूपाने त्याला मिळत असतो. इतका सामाजिक आशय असलेला विचार ‘करारा’ने कसा मिळणार? इस्लाममध्ये विवाहाला एखाद्या ‘करारा’सारखा उथळ दर्जा दिल्यामुळे, समाजाचे कसे विघटन होत आहे, हे आपण प्रत्यक्ष अनुभवत आहोतच. समाजात आज केवळ लैंगिकच नाही, तर विकृत लैंगिक गुन्हे वाढले आहेत आणि त्यात कोण सामील आहेत, हेही दिसत आहे. ही वृत्ती विवाह हा संस्कार न मानल्यामुळेच निर्माण झाली आहे, असे म्हटले तर चूक होणार नाही.
 
मुस्लिम समाजात तीनदा तलाक म्हणून विवाहसंबंधविच्छेद करण्याचा किंवा पाश्चात्त्यांसारखा सहजसुलभ घटर्सेंेट घेण्याचा आदर्श, आजकाल आम्ही, स्त्रीमुक्तीच्या गोंडस नावाखाली घेतला आहे. मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे, असे आम्ही नुसते उच्चारत असतो. परंतु, मनुष्याच्या उच्छृंखलपणामुळे समाजविघातक परिणाम होत असतील, तर त्याला संयत करण्यासही मागेपुढे बघायला नको ना! परंतु, स्त्रीमुक्तीची विकृत व्याख्या मान्य करून, समाजातील घातक उच्छृंखलतेचे समर्थन करण्याची वृत्ती आम्ही वाढवत चाललो आहोत. दुर्दैवाने, समाजातील मोठमोठ्या सेलिब्रिटिज, विचारवंत यात आघाडीवर आहेत.
 
पं. महादेवशास्त्री जोशी यांच्या भारतीय संस्कृतिकोशात विवाहाचे प्रयोजन सांगताना, याज्ञवल्क्य स्मृतीतील एक श्लोक उद्धृत केला आहे- ‘धर्मप्रजासम्पति: प्रयोजनं दारसङ्ग्रहस्य।’ म्हणजे धर्मसंपत्ती आणि प्रजासंपत्ती हे विवाहाचे प्रयोजन होय. समाजाचे अस्तित्व टिकावे, त्याचा उत्कर्ष व्हावा यासाठी समाजात सुप्रजा निर्माण होण्याची नितान्त आवश्यकता असते. सुप्रजा निर्माण व्हायची असेल, तर पती-पत्नी परस्परांवर अनुरक्त, सच्छील व कर्तव्यदक्ष असावी लागतात. लहानपणीच मुलांवर चांगले संस्कार झाले, तर मोठेपणी ती समाजाला उपयुक्त ठरतील. त्यासाठी पती-पत्नींनी धर्माचरणाने वागून सुप्रजानिर्मितीची पात्रता मिळवायची असते. विवाहसंस्कार त्यासाठीच असतो. विवाहातले मंत्र व प्रार्थना यासाठीच असतात. वधूला हाती धरून अग्नीला प्रदक्षिणा करताना वराने म्हणायचा एक मंत्र आश्वलायन गुह्यसूक्तात आहे- ‘तावेव विवहावहै। प्रजां प्रजनयावहै सं प्रियौ रोचिष्णू सुमनस्यमानौ जीवेम शरद: शतम्।’ अर्थ- आपण विवाहबद्ध होऊन प्रजा उत्पन्न करू या. एकमेकांवर प्रेम करून एकमेकांना आवडते होऊ या. एकमेकांविषयी शुद्ध मन ठेवून शंभर वर्षे जगू या. विवाहबद्ध होणार्या पती-पत्नींनी धर्म, अर्थ, काम हे तीन पुरुषार्थ परस्परसहकार्याने संपादित करायचे असतात. या सर्व गोष्टी साध्य होण्यासाठी पती-पत्नीचे लैंगिक संबंध निष्ठेचे असले पाहिजेत, असाही वेदांचा व धर्मशास्त्रांचा आग्रह आहे. म्हणूनच अन्य धर्मांत एक करार या स्वरूपात साजरा केला जाणारा विवाह, हा हिंदूंमध्ये एक पवित्र संस्कार समजला जातो. कराराच्या अटींचा भंग झाल्यावर करार संपुष्टात येतो आणि दम्पती विभक्त होतात. संस्काराने बद्ध झालेले वधू-वर दुर्दैवाने परस्परांपासून दूर झाले, तरीही वियोगाची कारणे निरस्त झाल्यावर ते परत एकत्र येऊन संसार करू शकतात. यदाकदाचित ती दोघे एकत्र न आली तरी त्यांचे पती-पत्नी हे नाते यावज्जीव अभंग राहते. कारण, ते नाते कराराने नव्हे, तर धर्माने निर्माण झालेले असते. पं. महादेवशास्त्रींचे हे विवेचन, आपल्या सनातन धर्मातील विवाहसंस्थेची महत्ता विशद करण्यास पुरेसे आहे.
 
इतकी उदात्त व सामाजिक आशय असलेली आपली विवाहसंस्काराची परंपरा, आज अन्य धर्मीयांच्या प्रभावाने दूषित झालेली दिसत असली, तरी आपण त्याच्या मूळ हेतूकडे जायला हवे. परंतु, उलटेच होताना दिसत आहे. आपली विवाहसंस्था प्रदूषित झाली म्हणून तिच्यावर टीका करत करत आम्ही तिला अधिकच विकृत करत चाललो आहे. विवाहसमयी पुरोहित जे मंत्र म्हणतात, तिकडे तर कुणाचेच लक्ष नसते. सर्व लक्ष थाटमाट, मानापमान, कपडेलत्ते, वधूला वराने उचलणे, मंगलाष्टके संपताच जोरात बोंब ठोकणे... या व अशाच थिल्लर गोष्टींकडे असते. आता ओवैसींनी इस्लामी व हिंदू विवाहपद्धतीतला र्ेंरक उघडच केला आहे, तर आपणही काही जबाबदारी स्वीकारायला हवी. रस्त्यावर उतरून, ब्राह्यप्रतीके अंगावर घालून सनातन धर्माचा अभिमान बाळगणे, काही प्रसंगी अत्यावश्यक असले, तरीही अखिल मानवजातीत अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा असलेला आपला विवाहसंस्कार पुन्हा मूळ शुद्ध व लखलखीत स्वरूपात समाजात कसा प्रतिष्ठित होईल, याचेही प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवेत. ओवैसीसारख्यांच्या विचारांना विरोध करता करता, एवढे जरी परिवर्तन हिंदू समाजाने स्वत:त घडविले तरी पुरेसे आहे...
@@AUTHORINFO_V1@@