कारगिल विजय दिन देशभर अभिमानाने साजरा झाला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jul-2019
Total Views |



कारगिल विजय दिवसाचा विसावा वर्धापन दिन काल देशभर अभिमानाने साजरा झाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी श्रीनगरमधल्या बदामी बाग सेना मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात कारगिल युद्धातल्या शहीदांना पुष्पाजंली वाहिली. मुंबईत आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीद जवानांना आदरांजली वाहिली.

जालना, बीड, भंडारा, अहमदनगर, नाशिक, उस्मानाबाद यासह सर्वच ठिकाणी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. परभणी इथं जिल्ह्यातल्या हुतात्मा सैनिकांच्या वीर पत्नी आणि वीर माता यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला, हुतात्मा सैनिक गणेश चित्रेवार यांच्या वीर पत्नी अर्चना चित्रेवार यांना शासनाकडून एकर शेतीची कागदपत्रं जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्या हस्ते यावेळी प्रदान करण्यात आली.


उस्मानाबाद इथं जिल्हाधिकारी डॉ दिपा मुधोळ मुंडे यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहिदांना अभिवादन केलं. औरंगाबाद, जालनासह राज्यातल्या सर्व जिल्ह्यात यादिनानिमित्त 'उरी सर्जिकल स्ट्राईक' हा चित्रपट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत दाखवण्यात आला.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat
@@AUTHORINFO_V1@@