'अर्जुन पटियाला' आणि 'जजमेंटल है क्या' ला समाधानकारक प्रतिसाद

    27-Jul-2019
Total Views |


'अर्जुन पटियाला' आणि 'जजमेंटल है क्या' हे दोन्ही चित्रपट काल देशभर प्रदर्शित झाले. दोन्ही चित्रपटांची पहिल्या दिवसाची बॉक्स ऑफिसवरील कमाई तितकीशी वाखाणण्याजोगी झाली नाही. मात्र 'जजमेंटल है क्या' चित्रपटाने त्यातल्या त्यात समाधानकारक कमाई केली.

'अर्जुन पटियाला' हा एक विडंबनात्मक चित्रपट आहे. आणि भारतातील चित्रपटांचा इतिहास बघता या धाटणीच्या चित्रपटांना आत्तापर्यंत तितकासा चांगला प्रतिसाद प्रेक्षकांकडून मिळालेला दिसत नाही. दरम्यान हा चित्रपट देखील दुर्दैवाने याला अपवाद ठरला नाही. दिलजीत डोसांज च्या फेम मुळे चित्रपट चांगला चालेल अशी शक्यता होती मात्र ती सुद्धा फोल ठरली. .२७ कोटींच्या पहिल्या दिवसाच्या कमाईसह चित्रपटाचा पुढील प्रवास हा देखील खडतर आहे.

'जजमेंटल है क्या' या चित्रपटाची प्रदर्शनापूर्वीच प्रचंड चर्चा सर्वत्र सुरु होती मात्र त्याचे रूपांतर चित्रपटाच्या कमाई मध्ये मात्र करण्यास चित्रपटकर्ते असफल ठरले. मात्र त्यातल्या त्यात समाधानकारक कमाई चित्रपटाने पहिल्या दिवशी केली असे म्हणता येईल. .२५ कोटी इतकी कमाई चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केली.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat