पन्नास वर्षांत नाही झाले ते ५० दिवसांत केले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jul-2019
Total Views |



नवी दिल्ली : गेल्या ५० वर्षांत अपूर्ण राहिलेली विविध विकासकामे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने फक्त ५० दिवसांत पूर्ण केल्याचा दावा भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी शुक्रवारी केला. केंद्रात दुसऱ्यांदा पूर्ण बहुमताच्या जोरावर सत्ता प्रस्थापित करणाऱ्या मोदी सरकारने शुक्रवारी आपला ५० दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केला. याबाबत नड्डा यांनी सरकारचे 'रिपोर्ट कार्ड'सादर केले.

 

५० दिवसांत सरकारने घेतलेले निर्णय गेल्या ५० वर्षांत घेतलेल्या निर्णयांपेक्षा उजवे आहेत, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी प्रसारमाध्यमांना संबोधित करताना ते म्हणाले, "आतापर्यंत सरकारचा १०० दिवसांचा प्रोग्रेस रिपोर्ट दिला जात होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापुढे ५० दिवसांचा रिपोर्ट देण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसारच हे रिपोर्ट कार्ड मी आपल्यापुढे ठेवत आहे," असे नड्डा यांनी यावेळी नमूद केले.

 

ग्रामीण भागांत २०२४पर्यंत शुद्ध पाणी

 

पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं लक्ष्य डोळ्यापुढे असून विकासाच्या मार्गावर चालण्याचा निर्धार सरकारने केला आहे. सरकारने आपल्या नव्या पर्वात पहिल्या ५० दिवसांत कमकुवत वर्गावर लक्ष्य केंद्रीत केले. ग्रामीण भारतातील प्रत्येक गावात २०२४ पर्यंत शुद्ध पाण्याची योजना हे क्रांतिकारक पाऊल आहे, असे नड्डा म्हणाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@