'बच्चन पांडे' मधील अक्षय कुमारचा दमदार लूक प्रदर्शित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jul-2019
Total Views |



बॉलिवूडचा
खिलाडी अक्षय कुमार सध्या या त्याच्या आगामी चित्रपटामध्ये व्यस्त आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी 'मिशन मंगल' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. भारताच्या मार्सवरील ऐतिहासिक कामगिरीच्या सत्यघटनेवर आधारित 'मिशन मंगल' या चित्रपटात विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा यांसारखे सुप्रसिद्ध कलाकार असणार आहेत. 'मिशन मंगल' ची चर्चा सुरु असतानाच आज अक्षय कुमारच्या पुढील चित्रपट 'बच्चन पांडे' या चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली.


'बच्चन पांडे' या चित्रपटाची साजिद नाडियावाला प्रोडक्शन हाऊसतर्फे निर्मिती करण्यात येणार आहे. फरहाद सामजी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून पुढील वर्षी ख्रिस्तमस दरम्यान चित्रपट प्रदर्शित होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. या चित्रपटाची पहिली झलक आज प्रदर्शित झाली असून यामध्ये अक्षय कुमार एका काळ्या रंगाच्या लुंगीमध्ये दिसून येत आहे तर त्याच्या चेहऱ्यावर करारी भाव दिसत आहेत. अक्षय कुमारने हा फर्स्ट लूक सोशल मीडियावर पोस्ट करताच तो प्रचंड व्हायरल होत आहे.


'बच्चन पांडे' या चित्रपटाबरोबरच त्या काळात अमीर खान ची 'लाल सिंह चड्डा' तर रणबीर आणि अजय देवगण यांचे देखील चित्रपट प्रदर्शित होण्याची चिन्हे आहेत. मात्र सध्या अनेक चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखा ऐनवेळी देखील बदलल्याचे प्रसंग आले आहेत. त्यामुळे येत्या काळात या चित्रपटांविषयीच्या अधिकृत घोषणेकडे प्रेक्षकांचे लक्ष असेल.



माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@