बंगळुरू/दिल्ली: कर्नाटकातील राजकीय नाट्यानंतर आज भाजपचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी राज्यपालांची भेट घेत सरकार स्थापण्याचा दावा केला आहे. तसेच राज्यपाल वजुभाई वाला यांच्याकडे नव्या सरकारचा शपथग्रहण सोहळा आजच घेण्यात यावा अशी विनंती केली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पांचा प्रस्ताव मंजूर केला असून आजच नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथग्रहण सोहळा होणार आहे. येडियुरप्पा सरकारला ३१ जुलै पर्यंत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.
Shri @BSYBJP will take oath as CM of Karnataka today evening at 6 pm
— BJP Karnataka (@BJP4Karnataka) July 26, 2019
दरम्यान, येडियुरप्पा हेच कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असतील अशी माहिती पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी दिली. येडियुरप्पा आज संध्याकाळी ६ वाजता मंत्रिपदाची शपथ घेतील. ‘आपण राज्यपालांची भेट घेतली असून सरकार स्थापण्याचा दावा केला असून आज संध्याकाळी ६ वाजता मंत्रिपदाची शपथ घेऊ’, असे येडियुरप्पा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat