बिग बॉस मराठीच्या घरात रंगणार लक्झरी बजेट कार्य !

    26-Jul-2019
Total Views | 24



मुंबई
: बिग बॉस मराठीच्या घरात सात बारा हे साप्ताहिक कार्य रंगत आहे. आज घरामध्ये बिग बॉस सदस्यांवर लक्झरी बजेट कार्य सोपवणार आहेत. या कार्याचे स्वरूप ऐकताच सदस्यांना खूप गंमत वाटली. बिग बॉस मराठीच्या घरातील दोन सदस्य वीणा आणि शिव यांच्यातील मैत्री सुंदर आणि प्रेरणादायी आहे. दोन्ही सदस्य एकमेकांची काळजी घेतात आणि प्रेमाने एकमेकांशी बोलतात. पण यांच्यात खटके देखील उडतात आणि मग मैत्रीत अडथळा येतो. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कार्यामध्ये नेमून दिलेली दोन कुटुंबे वधू - वर सूचक मंडळात जाणार आहेत. आता या वधूवर सूचक मंडळात काय घडणार ? कोणाची बाजू वरचढ ठरणार ? कोण जिंकणार ? हे बघणे रंजक असणार आहे... तेव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन आज रात्री .३० वा.


कालच्या भागामध्ये नेहा आणि टीम B मधील सदस्यांमध्ये बराच वाद झाला. नेहा आणि शिवानीने केलेल्या युक्तीची प्रशंसा देखील बिग बॉस यांनी केली. किशोरी आणि नेहा मध्ये फुलं मोजण्यावरून आणि मार्क्स देण्यावरून वाद झाला. शिवानीला सुरु टास्कमध्ये रडू कोसळले, कारण ज्याप्रकारे सदस्य टास्क खेळत होते त्याची भीती वाटणे सहाजिक होते. तर शिवचा हीना आणि आरोह बरोबर वाद झाला. आज या टास्कमध्ये काय होणार ? कोणती टीम बाजी मारणार ? हे कळेलच.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121