सपाचे खासदार आझम खान यांच्या निलंबनाची मागणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jul-2019
Total Views |

 

 
 
नवी दिल्ली : लोकसभेत सलग दुसऱ्या दिवशीही समाजवादी पक्षाचे नेते खासदार आझम खान यांच्या वादग्रस्त विधानावरून गदारोळ झाला. केंद्रीय मंत्री रविशंकर आणि स्मृती इराणी यांनी आझम खान यांनी माफी मागावी व त्यांचे निलंबन केले जावे अशी मागणी केली. लोकसभा म्हणजे काही पुरुषांनी महिलांच्या डोळ्यात पाहण्यासाठी येण्याचे ठिकाण नाही. संपूर्ण लोकसभेसाठी हा लाजिरवाणा प्रकार होता.
 

माझ्या सात वर्षांच्या संसदीय कार्यकालात मी आजपर्यंत कोणत्याही पुरुषाने अशा प्रकारचे वक्तव्य करताना ऐकलेले नाही. हा विषय महिलांचा नसून लोकसभेसह राज्यसभेतही अनेक पुरुषांनी आपल्या सामाजिक, राजकीय कार्यकालात महिलांच्या संरक्षणासाठी आवाज उठवला आहे, असे महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या या सर्व गोंधळानंतर दुपारी 2 पर्यंत सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. अध्यक्ष ओम बिरला यांनी याबाबत सर्व पक्षांची बैठक घेऊन त्यानंतरच निर्णय होईल असे सांगितले. भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी आझम खान संसदेच्या बाहेरही महिलांचे अपमान करतात असे म्हटले.

 

अशा प्रकारचे वर्तन लाजिरवाणे असल्याचे कायदा व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनीही म्हटले आहे. रमा या ज्येष्ठ नेत्या आहेत. त्यावेळी अध्यक्षांच्या खुर्चीत होत्या. त्यांच्याबाबत केलेले वक्तव्य अत्यंत लाजिरवाणे होते. आझम यांनी एक तर माफि मागावी किंवा मग त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी प्रसाद यांनी केली आहे. भाजपसह टीएमसी, डीएमके आणि इतर अनेक पक्षांच्या खासदारांनी आझम खान यांचा निषेध केला. जो महिलांचा सन्मान करण्याचे जाणत नाही, त्याला देशाची संस्कृती काय आहे हेच माहीत नाही, हे सिद्ध होते, असे तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

  
@@AUTHORINFO_V1@@