‘बाबा’ने माझ्या सामाजिक जाणिवांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला - दीपक दोब्रियाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jul-2019
Total Views |



दिपक
दोब्रीयाल यांनीतनु वेडस मनू, ‘हिंदी मिडीयमयांसारख्या गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र त्यांचा आगामी मराठी चित्रपटबाबाहा त्यांच्यासाठी अत्यंत वेगळा आणि समाधान देणारा चित्रपट ठरला. ते म्हणतात की, त्यांची बारा वर्षांची चित्रपट कारकीर्द एका बाजूला आणि हा चित्रपट एका बाजूला! त्यांच्या दहा हिंदी चित्रपटांनी जेवढे समाधान दिले नाही तेवढे समाधान त्यांना या चित्रपटाने दिले.


बाबामध्ये दोब्रियाल एका मुख्य आणि बहिऱ्या वडिलांची व्यक्तिरेखा साकारत आहेत. दोब्रीयाल म्हणतात की, या चित्रपटाची संकल्पना आणि कथा यामुळे त्यांनी मराठी चित्रपट करण्याचे ठरवले. “बाबाची संकल्पना ऐकली तेव्हा माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीला मागे सारून मी हा चित्रपट करण्याचे ठरवले. मी तात्काळ या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला तारखांबद्दल विचारले आणि असेही सांगितले की, या चित्रपटासाठी चार महिने मी राखून ठेवत आहे इतर सर्व गोष्टी बाजूला सारत आहे. जर हा चित्रपट मला मिळाला नसता तर मी आयुष्यात बरेच काहीमिसकेले असते. या संधीसाठी मी राज आर गुप्ता यांचा शतशः आभारी आहे. चित्रपटाच्या संकल्पनेच्या व्यतिरिक्त या चित्रपटाने मला माझी इमेज नव्याने तयार करण्याची संधी दिली. मी विनोदी भूमिका केल्या आहेत, खलनायकाच्या भूमिका केल्या आहेत पणबाबामुळे माझ्या इमेजला कलाटणी मिळणार आहे,” ते म्हणतात.


या चित्रपटात दीपक दोब्रियाल यांच्या व्यतिरिक्त नंदिता पाटकर, स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर, शैलेश दातार, जयंत गडेकर आणि बालकलाकार आर्यन मेंघजी यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाला रोहन रोहन यांचे संगीत असून पार्श्वसंगीत सुस्मित लिमये यांचे आहे. या चित्रपटाची कथा मनिष सिंग यांनी लिहिली आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat


pasting
@@AUTHORINFO_V1@@