चांद्रयान २ चा दुसरा टप्पाही यशस्वीरित्या पार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jul-2019
Total Views |

 

 
 
श्रीहरीकोटा : भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या शास्त्रज्ञांनी शुक्रवारी सकाळी चांद्रयान-२ ची कक्षा यशस्वीरित्या बदलली. कक्षा बदलाचा हा दुसरा टप्पा होता. चांद्रयान २ ची पृथ्वीपासूनची कक्षा टप्याटप्याने वाढवण्यात येत आहे. चांद्रयान २ ची कक्षा बदलून पृथ्वीपासून २५१ किमी अंतरावर नेण्यात आले. सात सप्टेंबर रोजी चांद्रयान २ चंद्रावर उतरणार आहे. दोन दिवसांपूर्वी पहिल्यांदा चांद्रयान २ ची कक्षा बदलण्यात आली होती. चांद्रयान २ चा प्रवास योग्य दिशेने सुरु आहे असे इस्रोकडून सांगण्यात आले आहे.
 
 

१४ ऑगस्टला चांद्रयान २ चा पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु होईल. २० ऑगस्टला चांद्रयान २ चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल असे इस्रोकडून सांगण्यात आले. तीन सप्टेंबरला विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हर मुख्य यानापासून वेगळे होतील. त्यानंतर सात सप्टेंबरला लँडर चंद्रावर उतरेल. भारताच्या या महत्वकांक्षी चांद्रयान २ मोहिमेकडे जगाचे लक्ष लागले आहे. चंद्रावर पाण्यासह अन्य अनेक नवीन गोष्टी शोधून काढण्याचा चांद्रयान २ चा प्रयत्न असेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@