कारगिल युध्दाची २०वी वर्षपूर्ती, देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

    26-Jul-2019
Total Views |


 

नवी दिल्ली : कारगिल विजय दिवसाची २० वी वर्षपूर्ती देशभर साजरी केली जात आहे. २६ जुलै १९९९ मध्ये पाकिस्तान विरोधी झालेल्या युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. १९९९ सालचे कारगिल युद्ध जवळपास ६० दिवस सुरू होते. ८ मे ते २६ जुलै दरम्यान झालेल्या युद्धात भारताचे ५२७ जवान शहीद झाले होते. आज या घटनेला २० वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचेच स्मरण म्हणून कारगिल विजय दिवस साजरी करून शाहिद जवानांना आदरांजली वाहिली जाते.
 

'कारगिल विजय दिवसानिम्मिताने मातृभूमीच्या सर्व वीर पुत्रांना मी वंदन करतो. आजचा दिवस आपल्याला सैनिकांचे धैर्य, बहादुरी आणि समर्पण याची आठवण करून देतो. या प्रसंगी, त्या पराक्रमी योद्धांना माझी श्रद्धांजली, ज्यांनी मातृभूमीच्या बचावासाठी सर्वस्व बहाल केले. जय हिंद!' या शब्दांत पंतप्रधान मोदी यांनीही ट्विटरवर शहीदांना श्रद्धांजली वाहिली.

 
 
 

 

राज्यासह देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. कारगिल-द्रासमध्ये कार्यक्रमाची सगळी तयारी पूर्ण झाली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि तिन्ही सेनादलांचे प्रमुख इथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे देखील या कार्यक्रमात सहभागी होतील. तर विजय दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद परिसरात आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी होतील.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat