५ स्टार हॉटेल्सची सेवा खरेच ५ स्टार देण्याजोगी आहे का?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jul-2019
Total Views |



कामानिमित्त
, पर्यटनासाठी अशा अनेक कारणांमुळे ग्राहक बऱ्याचदा स्टार हॉटेलची सेवा घेताना आपण पाहतो. चंदिगढमधील अशाच एका स्टार हॉटेलविषयी राहुल बोस या प्रसिद्ध अभिनेत्याने दोन दिवसांपूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला जो सध्या प्रचंड व्हायरल होत असून ट्विटरवर ट्रेंडिंग आहे. हा व्हिडीओ आहे त्या हॉटेलने आकारलेल्या एका फ्रुटप्लेटच्या दराविषयीचा.


साधारण ४० रुपये डझन या दराने मिळणाऱ्या केळ्यांना हे स्टार हॉटेल तब्ब्ल ४०० रुपये आकारत आहे. राहुल बोसने अतिशय उपरोधाने या व्हिडिओमध्ये ही बाब नमूद केली असून ही ग्राहकांना लुटण्याची एक अत्यंत खेदजनक गोष्ट आहे.


या ट्रेंडिंग हॅशटॅगवर अनेक ग्राहकांनी त्यांना देखील आलेले अशाच प्रकारचे अनुभव पोस्ट केलेत ते पाहून तर आश्चर्यचकितच व्हायला होईल. सर्वसाधारणपणे आकारल्या जाणाऱ्या किमती आणि या स्टार हॉटेल्स च्या अवाजवी किमती यामध्ये इतकी तफावत का? आणि किती दिवस अशाप्रकारे ग्राहकांना लुटण्याचे प्रकार घडत राहणार? आणि यासाठी राहुल बोस सारख्या सुजाण ग्राहकांना याविरुद्ध आवाज उठवणे गरजेचे आहे.



माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@