‘समाजात बदल घडवण्यासाठी आम्ही इथे बसलो आहोत’: पूनम महाजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jul-2019
Total Views |

  

 
नवी दिल्ली : 'तिहेरी तलाक' या मुद्द्यावरून गुरुवारी लोकसभेत मोठी खडाजंगी सुरू आहे. संसदेच्या लोकसभा सभागृहात  तिहेरी तलाक विधेयक सादर करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर संसदेत खासदारांनी चर्चा केली. आपली बाजू मांडताना भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी विरोधकांना चांगलेच खडसावले. आपण त्या १० लाख महिलांचा विचार केला पाहिजे ज्यांनी या विधेयकाच्या समर्थनात सह्या केल्या आहेत. वेळेनुसार समाज बदलत जातो त्याबरोबरोबरच जुने संस्कार आणि रूढी देखील बदलल्या पाहिजे. आणि समाजात बदल घडवण्यासाठी आम्ही इथे बसलो आहोत, असे त्या म्हणाल्या. 
 
 
 

 

तिहेरी तलाक विधेयक मंजूर करून घेण्यासाठी मोदी सरकार गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्नशील आहे. गुरुवारी लोकसभेत तिहेरी तलाक विधेयक सादर करण्यात आले. त्यावेळी,  विधेयकाला विरोध करत करताना असुदुद्दीन औवेसी यांनी आपली बाजू मांडली. तिहेरी तलाक विधेयकामध्ये  तलाक देणाऱ्या व्यक्तीस तीन वर्षांची शिक्षा आणि दंडांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, काँग्रेससह औवेसी यांनीही या विधेयकास विरोध दर्शवला आहे.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@