राष्ट्रवादीला मोठा झटका : सचिन अहिर शिवसेनेत

    25-Jul-2019
Total Views |


 


मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांतील नेत्यांमध्ये पक्षांतराचा वेग वाढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे विश्वासू आणि राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. जर सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर राष्ट्रवादी खूप मोठा धक्का ठरेल. यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शिवसेनेचे बळ वाढले आहे.

 

मुंबई महापालिकेने पार्किंगचे दर वाढवले त्या विरोधात सचिन आहिर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेविरोधात आंदोलन केले होते. सचिन अहिर यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातील कामांबाबत नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेतली होती. अशा विविध माध्यमातून सचिन अहिर लोकांच्या संपर्कात होते. मात्र आता सचिन अहिर हेच शिवसेनेच्या वाटेवर असल्याने मुंबईत राष्ट्रवादी नावापुरती उरणार आहे.

 

"राष्ट्रवादी सोडताना फार आनंद होतोय असे नाही. गेली अनेक वर्ष एका विचाराने आणि एका प्रवाहात काम करत आलो आहे. शरद पवार यांच्यासोबत कधी न सुटणारी साथ आहे. राजकारणात काही वेळा काही निर्णय घ्यावे लागतात. मात्र ते निर्णय योग्य की अयोग्य हे काळच ठरवेल. आदित्य ठाकरे यांच्या कामाने आणि व्हिजनने प्रभावित झालो आहे. आदित्य यांच्याकडे जनहिताची कामे करण्याची जिद्द आहे. त्यामुळे शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यानंतर निर्णय घेतला." असे सचीन अहिर यांनी सांगितले.

  

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat