गर्लफ्रेंड चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचे यु/ए सर्टिफिकेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jul-2019
Total Views |



उपेंद्र
सिधये दिग्दर्शित 'गर्लफ्रेंड' हा चित्रपट प्रदर्शनाच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. दरम्यान सेन्सॉर बोर्डने चित्रपटाला यु/ सर्टिफिकेट दिले असून चित्रपटाची लांबी तास १८ मिनिटे इतकी निश्चित करण्यात आली आहे. ह्यूज प्रॉडक्शन्स आणि प्रतिसाद प्रॉडक्शन्स यांची निर्मिती असलेला हा चित्रपट उद्या महाराष्ट्रभर प्रदर्शित होईल.


या चित्रपटाच्या कलाकारांविषयी बोलायचे झाल्यास त्यांच्या भूमिका अशा आहेत : अमेय वाघ (नचिकेत प्रधान), सई ताम्हणकर (आलीशा नेरुरकर), रसिका सुनील (श्वेता), ईशा केसकर (कावेरी), सागर देशमुख (दांडेकर), कविता लाड (आई), यतीन कार्येकर (बाबा), सुयोग गोऱ्हे (सँडी),उदय नेने (अद्या), तेजस बर्वे (रोहन)


चित्रपटाची पटकथा आणि संवाद स्वतः उपेंद्र सिधये यांनी लिहिलेत. चित्रपटाला हृषीकेश,सौरभ आणि जसराज यांनी संगीत दिले असून चित्रपटातील गाणी सुप्रसिद्ध गीतकार क्षितीज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केली आहेत. या उत्कृष्ठ गाण्यांना जसराज जोशी, शाल्मली खोलगडे, श्रुती आठवले यांच्या स्वरांची साथ लाभली आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@