राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jul-2019
Total Views |



कोल्हापूर : कोल्हापूरमधील राष्ट्रवादी दिग्गज नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर आयकर विभागाने छापे मारले आहेत. आयकर विभागाची टीम गुरुवारी पहाटे त्यांच्या निवासस्थानी दाखल झाली. आयकर विभागाने हसन मुश्रीफ यांच्या मुलाच्या घरासह टाकळा परिसरात राहणारे त्यांच्या साडूच्या घरावरही छापा टाकला आहे. या छाप्यांमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

 

हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. ते कोल्हापुरातील कागल मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व करतात. हसन मुश्रीफ हे कोल्हापुरातले मोठे नाव असून शरद पवारांच्या जवळचे आणि विश्वासू नेते मानले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा मुस्लीम चेहरा म्हणून हसन मुश्रीफ यांची पश्चिम महाराष्ट्रात ओळख आहे. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@