त्या २५ करोडमध्ये येतात का?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jul-2019   
Total Views |




हवे तेव्हा हवे तसे पत्नीला तलाक देणार्‍या लोकांना पाहून इतरांना वाटायचे की काय हे? अल्लातालाच्या साक्षीने काझीने लग्न लावले, वर कबुल कबूल म्हणून संमतीही विचारली तरी या माणसाने त्याच्या पत्नीला केवळ त्याला तसे वाटले म्हणून वार्‍यावर सोडून दिले. माणसाला काही निती, माणूसकी आणि अल्लाचे भय आहे की नाही? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर ओवैसींनी संसदेत पटापट देऊन टाकली. त्यांनी सरळच म्हंटले की इस्लाममध्ये लग्नाचे नाते जन्मजन्माचे नसते. सात जन्माचे बंधनही नसते. (थोडक्यात गर्भितार्थ की लग्न टिकणे इतके महत्वाचे नाही.) आता इथे काही नतद्रष्ट म्हणतीलच की जन्माजन्मीचे नसले तरी त्याला माणूसकीचे आणि नितीचे तरी नाते असते की नाही? नसूदे जन्माचे पण या जन्मात तरी त्याचे काही महत्व आहे की नाही. की आले मनात दिला तलाक असेच आहे? वाईट वाटले तरी दुर्देवाने चित्र असेच आहे. ओवैसींनी विवाह संकल्पनेबाबत जे म्हंटले त्यामुळे काही नालायक अरबांची आठवण झाली. काही अरब काही दिवसासाठी फिरायला थोडक्यात आपले आबंट शौक पुर्ण करण्यासाठी भारतात येतात. त्यांचा मुख्य अड्डा हैदराबादच असतो हे विशेष. याच हैदराबादचे प्रतिनिधीत्व ओवैसी करतात हे त्याहून विशेष. तर हे अरब हैदराबदामध्ये येऊन दुधाचे कोवळे दात पडले नाहीत अशा मुस्लिम मुलींशी निकाह करतात. त्यानंतर या कोवळ्या मुलींची जिंदगी बरबाद करून ट्रिपल तलाक देऊन त्यांना कायमचे सोडून देतात. कारण म्हणे तशी धर्मात मुभा आहे. या मुलींचे दुख ओवैसी यांना माहिती असेल का? यांचे सोडा पण शोहरने तलाक शब्दही उच्चारू नये म्हणून त्याची गुलामी करणारी असहाय दुर्बल अम्मीजानश आप्पाजान,खालाजान ओवैसींनी कधी पाहिल्यात का? आपला नवरा आपल्याला कधीही सोडू शकतो ही त्यांच्यातली भिती त्यांना आयुष्यभर मरून मरून जगायला लावते हे ओवैसींना माहिती आहे का?आपल्याच धर्मभगिनींच्या वेदनेची अनुभूती ओवैसींना नसेल तर देशातले २५ करोड मुस्लिम वगैरे वगैरें म्हणण्याचा हक्क ओवैसींना आहे का? या २५ करोडमधील अर्धी आबादी भारतीय मुस्लिम स्त्री आहे. या मुस्लिम धर्मातील स्त्रीया ओवैसींच्या २५ करोडमध्ये येतात की नाही? याचा खुलासा अकबरूददीन ओवैसींनी करावा.

 

बहु बेटींना हवी सुरक्षा

 

इस्लाममध्येच काय हिंदू इसाई आणि देशात अस्तित्वात असलेल्या कोणत्याही धर्माच्या कोणत्याही माणसासोबत कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करण्याचे संविधान सांगते. संसद संविधानाच्या तत्वावर चालते, तसेही भारतीय लोकशाही निधर्मी आहे. अकबरूद्दिन ओवैसी तर नेहेमीच देश निधर्मी तत्वावर आहे आणि तसाच राहाव असे त्रिनीत्रिकाळ बोंबलत असतात.(इथे बोंबलणे हा एकच शब्द चपलख बसतो). तरीही देशाच्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये गेल्यावर खासदार ओवैसींना हटकून मुस्लिम धर्म आठवतोच आठवतो. ट्रिपल तलाकवर चर्चा करताना ओवैसी म्हणाले की इस्लाममध्ये लग्नाचे नाते जन्मजन्मातरीचेे नसते. अर्थात ओवैसींना कुणी विचारले नव्हते की ओवैसी मुस्लिम धर्मात विवाहाची संकल्पना स्पष्ट करा बरं. पण तरीही त्यांनी आपले विचार मांडले. आपले यासाठीचे की मुस्लिम धर्मातही बहुसंख्य जोडपी अशी आहेत की त्यांना या जन्मातच नव्हे तर जोपर्यंत जन्म घेतील तोपर्यंत त्यांना या जन्मीचाच वैवाहिक साथिदार हवा आहे. भले धर्मात लिहलेले असो वा नसो. याबाबत खुद्द ओवैसी यांच्या घरातील महिला वर्गांला जरी विचारले तरी सुद्धा त्या या म्हणण्याला दुजारोच देतील. तसेही कोणत्याही धर्मात विवाहाला जरी धार्मिक अधिष्ठान असले तरी ते टिकवणे किंवा तोडणे याला माणसाचे नैतिक बंधच कारणीभूत असतात. त्यामुळे सध्याच्या काळात ओवैसींनी आणि कुणीही विवाह जन्माजन्मीचे कि कसे यावर बोलूच नये. दुसरे असे की आपला देश निधर्मी असल्यामुळेच देशाची संसदही निधर्मी आहे.त्यामुळे संसदेमध्ये आमच्या धर्मात असे नी आमच्या धर्मात तसे सांगणे म्हणजे ससंदेचा आणि देशाचा वेळ वाया घालवण्यासारखेच आहे. संसद घटनेप्रमाणेच चालणार. तीथे धर्माचे अधिष्ठान असले तरी रिती रूढी पंरपरा यांचा विचार मानवी मुल्यांवरच केला जाणार. हे मानवी मुल्य अमुक एक धर्माच्या स्त्रीसाठी वेगळे आणि तमुक एक धर्माच्या स्त्रीसाठी वेगळे नसते. घटस्फोटित हिंदू स्त्रीचे आणि तीच्या माहेरच्यांचे दुख हे तलाकशुदा मोहतरमाच्या आणि तीच्या माहेरच्यांच्या दुखापेक्षा वेगळे नाही. त्यामुळे देशातील कोणत्याही स्त्रीसारखेच मुस्लिम स्त्रीयांनासुद्धा विवाहाची सुरक्षितता असायलाच हवी.



माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@