देवबंद विद्यापीठात मुस्लीम विद्यार्थ्यांची माथी भडकविण्याचे काम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jul-2019
Total Views |


 


लखनौ : देवबंद विद्यापीठात मुस्लीम विद्यार्थ्यांची माथी भडकविण्याचे काम सुरू असल्याचा धक्कादायक दावा माजी कें द्रीय मंत्री आणि मुस्लीम अभ्यासक आरिफ मोहम्मद खान यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला आहे. दरम्यान, खान यांचे वक्तव्य मुस्लीम समुदायात खळबळ उडवून देणारे ठरणार आहे.

 

देवबंद विद्यापीठाच्या वादग्रस्त पुस्तकात ‘जिहाद’ या संकल्पनेचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. कुराणात सांगण्यात आलेला जिहाद संकल्पनेचा पवित्र अर्थ बाजूला ठेवून दहशतवादाला खतपाणी घालणारा नापाक म्हणजेच चुकीचा अर्थ शिकवला जात आहे. ‘ज्यांना इस्लाम मान्य नाही, त्यांच्या विरोधात लढा’, असा अर्थ विद्यापीठात शिकवण्यात येत असून, आशिया खंडातील सर्वात मोठ्या उत्तर प्रदेशच्या देवबंद विद्यापीठात जिहादचा विपर्यास केल्याचे आरिफ मोहम्मद खान यांनी म्हटले आहे.

 

देवबंदच्या अभ्यासक्रमात ‘अशरफुल हिदाया’ नावाच्या पुस्तकातील एका उतार्‍याची भाषा अत्यंत स्फोटक अशी आहे. गेली अनेक वर्षे हे पुस्तक देवबंदच्या अभ्यासक्रमाचा भाग बनले आहे. देशोदेशीची मुले जिहादचा चुकीचा अर्थ शिकत असल्याचेही खान यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, देवबंद विद्यापीठातील पुस्तकावर आरिफ मोहम्मद खान यांनी केलेले आरोप गंभीर असून, ‘अशरफुल हिदाया’मधील मजकुराची तपासणी केली असता त्यात तथ्य आढळून आले.

 

लातूर येथील मुस्लीम अभ्यासक आणि मौलवींना याबाबत विचारले असता त्यांनीही पुस्तकात जिहादचा चुकीचा अर्थ शिकवला जात असल्याचे सांगितले आहे, असे संबंधित वृत्तवाहिनीने आपल्या प्रकाशित वृत्तात म्हटले आहे. देवबंद हे उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधील गाव असून, या ठिकाणी १८६६ मध्ये दार-उल-उलून ही मुस्लीम अभ्यासकांची संस्था सुरू झाली. इजिप्तच्या मुस्लीम विद्यापीठानंतर देवबंदला मोठा दर्जा आहे. देशविदेशातील विद्यार्थी या ठिकाणी मुस्लीम धर्म, तत्त्वज्ञानाचे धडे घेत असतात.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@